विचारांच्या स्वातंत्र्याला संस्कारांची जोड असावी

नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांचे प्रतिपादन
वेल्फेअर जर्नालिस असोसिएशनच्यावतीने महिला दिनानिमित्त महिला पत्रकारांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
    नवी मुंबई,  7 मार्च 2024

आजचं जग हे धावपळीचं आहे. रोजच्या लढाई लढताना आपला स्वभाव कितीही सकारात्मक असला तरी होय बरोबर नाही हा शब्दही आपल्या डिक्शनरीत असला पाहिजे. जर एखादे काम आपल्या मनाविरुद्ध होत असेल तर तिथे नाही म्हणायला शिकणे ही काळाची गरज आहे. विचारांच्या स्वातंत्र्याला संस्कारांची जोड असावी असं मत नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी आज व्यक्त केलं.

नवी मुंबई जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने नवी मुंबई महापालिका मुख्यालयातल्या पत्रकार कक्षामध्ये महिला पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला विधीतज्ज्ञ अ‍ॅड. वंदना दळवी, पोलीस अधिकारी शुभांगी पाटील, कुस्तीपटू सुवर्णपदक विजेत्या राजश्री बांगर, अभिनेत्री श्रेजा म्हात्रे तसंच विविध वृत्तवाहिनी, वृत्तपत्र, डिजीटल मिडीयामधील महिला पत्रकार  आणि असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या मार्गदर्शनपर भाषणात अति. आयुक्त सुजाता ढोले म्हणाल्या की,  या जगात आपल्या मुलांवर चांगले संस्कार झाले तरच भावी पिढी उत्तम होईल, अन्यथा फार मोठ्या संकटाला सामोरे जावं लागणार आहे . नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी मी गेली 4 वर्षे काम करत आहे. कोविड काळात आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळता आली. सलग 18 3 दिवस या काळात काम केल्याचं ही त्यांनी सांगितलं. वाशी इथल्या कोविड सेंटरमधील सर्व सोयी सुविधा, उपचार, संपूर्ण व्यवस्था या कामाची अमेरिका सारख्या देशाने घेतली आणि पालिकेने केलेल्या कामाची प्रशंसा केली.

ढोले मॅडम यांनी यावेळी कोविड काळातले अनुभव मांडताना उपस्थित पत्रकार महिलांना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. दुखणे अंगावर काढणं सोडून दिलं पाहिजे. एखाद्या विकारावर लवकर उपचार केला तर तो बरा होतो. मात्र परिस्थती हाताबाहेर गेली तर अनर्थ घडतो आणि संपूर्ण कुटुंबाची घडी बिघडते. त्यामुळे आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला ढोले मॅडम यांनी दिला.

विधीतज्ज्ञ अ‍ॅड. वंदना दळवी यांनी विविध कलमांची माहिती देत महिलांच्या असलेले कायदे यांबाबत माहिती दिली. पोलीस अधिकारी शुभांगी पाटील यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांच्या वतीने करण्यात आलेले विविध उपयोजना यांबाबत माहिती दिली.

112 क्रमांक आणि विशेषत : महिलांसाठी असलेल्या 1091 या क्रमांकाची माहिती दिली. निर्भया पथक, प्रत्येक पोलीस ठाण्यात असलेले महिला सहाय्य कक्ष यांबाबत विस्तारित माहिती दिली. फेसबुक, व्हॉट्सअॅप वरील अनोळखी व्हिडिओ कॉल उचलल्यामुळे होणारी फसवणूक यांबाबत उदाहरणातून माहिती दिली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अशोक शेशवरे, प्रमुख सल्लागार विश्वरथ नायर, सचिव नागमणी पाण्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिलकुमार उबाळे यांनी केले.

यावेळी उपस्थित महिला पत्रकार  स्वाती नाईक झी 24 तास वृत्तवाहिनी , स्वप्ना हरळकर आकाशवाणी , संपादक अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क, अंकिता पाटील आवाज जनतेचा, वंदना मंत्रे उपसंपादक दै. नवराष्ट्, रूपाली वाघमारे संपादक सा. आजची उद्योग नगरी, शिल्पा नरवडे पुढारी न्युज वृत्तवाहिनी , कविता लोखंडे जय महाराष्ट्र वृत्त वाहिनी, मोनिका गोठेकर न्युज 24 नेटवर्क, वैभवी शिंदे वार्ताहर दै. सकाळ, मोनाली माळी सा. आजची नवी मुंबई, तन्वी पवार उपसंपादक दै. रामप्रहर, रैना असनार दै. हिंदू, समीरा मुन्शी दै. हिंदुस्थान, रेणू पांडे, प्रतिक्षा पवार उपसंपादक दै. नवराष्ट्, सेजल नेने उपसंपादक दै. नवराष्ट्, योगिता येरपुडे उपसंपादक दै. नवराष्ट्, माधवी पाटील उपसंपादक दै. लोकमत, संध्या श्रीवास्तव दूरदर्शन, मिना आर. प्रशांत असिस्टंट एडिटर न्यूज बॅड, निशा ढेंगळे उद्याेग नगरी, संध्या हांडे संपादक हक्काचा आवाज, मुस्कान मकानदार नवी मुंबई आवाज, पूनम आगवणे वार्ताहर सा. हक्काचा आवाज, संध्या बिडकर दै. नवनगर, पद्मजा जांगडे उपसंपादक दै. सकाळ, वर्षा राजपूत न्यूज शाही, अंजली भुजबळ आदींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

========================================================

========================================================