महापालिका कर्मचाऱ्यांनी केला टेम्पो भरून प्लास्टिक कचरा जमा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २ ऑक्टोबर २०१९

 महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता अभियाना अंतर्गत नवी मुंबई महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्यावतीने सेक्टर-48 नेरुळ खाडी किनाऱ्यालगत पडलेल्या प्लास्टिक व काचेच्या वस्तू जमा करून परिसर साफसफाई करण्यात आली.

महापालिका आय़ुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर स्वच्छतेच्या कामाला सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. त्यानुसार महापालिकेच्या हद्दीत नियमितपणे प्लास्टिकविरोधी मोहिम, तसेच कचऱ्याचे योग्य वर्गीकरण आणि स्वच्छतेबाबत उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून गांधी जयंतीनिमित्त प्लास्टिक कचरा साफ करण्याची मोहीम आखण्यात आली होती.

या मोहिमेत शशिकांत तांडेल विभाग अधिकारी, शंकर पाटील, विजय नाईक, धीरेन भोईर, पराग शिर्के, राजेश्री पाटील आणि अन्य कर्मचाऱ्यांनी या प्लास्टिक सफाई मोहिमेत भाग घेतला होता. नेरुळ, सेक्टर ४६,४८, ४६ ए आदी परिसरातून टेम्पोभरून प्लास्टिक आणि काचेच्या वस्तू या कर्मचाऱ्यांनी जमा केल्या.

यावेळी शशिकांत तांडेल, शंकर पाटील यांनी पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळा, असे आवाहन नागरिकांना केले.

 

==============================================

इतर बातम्यांचाही मागोवा