सिडको भवनमध्ये रंगला ‘भोंडला’

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १ ऑक्टोबर २०१९:

सध्या सगळीकडे नवरात्रोत्सवाची धामधूम सुरू आहे. नऊ दिवस वेगवेगळ्या साड्या तसेच पेहराव करीत समस्त महिलावर्ग नवरात्रोत्सवाचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करीत आहेत. तसेच पारंपरिक खेळ आणि गाण्यांचा आनंदही लुटत आहेत.

सिडकोमधील महिला कर्मचाऱ्यांनीदेखील  आज (१ ऑक्टोबर) भोंडल्याचे आयोजन केले होते. सिडको भवन येथे पार पडलेल्या या भोंडल्याला सर्व महिला कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली.

नेहमीच्या कामाच्या धावपळीतून काही क्षण एकत्र घालवण्याची संधी मिळाल्यामुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण पसरले . कनिष्ठ महिला कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांसह सगळ्या या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.

========================================================

इतर बातम्यांचाही मागोवा