पनवेलमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

पनवेल, १७ ऑक्टोबर २०१९ :

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमधील भाजप, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीमधील नेत्यांची बैठक आ प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

पनवेल विधानसभेतील महायुतीचे उमेदवार आ. प्रशांत ठाकूर  यांच्या विजयासाठी महायुतीमधील नेते सज्ज झाले आहेत. ठाकूर यांचा विजय अधिकाधिक मतांनी व्हावा यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली.

या बैठकीस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत, जिल्हा सल्लागार बबन पाटील, आरपीआयचे कोकण प्रांत अध्यक्ष जगदीश गायकवाड, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास पाटील, महानगर प्रमुख रामदास शेवाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य परेश पाटील यांच्यासह युतीतील इतर पदाधिकारी उपस्थित होते.

========================================

इतर बातम्यांचाही मागोवा