अनैतिक व्यापारप्रकरणी बेलापूरमध्ये एकाला अटक

एनआरआय पोलिसांची धडक कारवाई

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी  मुंबई, १९ डिसेंबर २०२०

बेलापूर येथील एका लॉजमध्ये अनैतिक व्यापार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर एनआरआय पोलिसांनी धाड टाकली. बुधवारी या कारवाईदरम्यान एकाला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

  • WATCH: Other story on Youtube 

बेलापूर गावातील एका लॉजमध्ये अनैतिक व्यवहार होत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी प्रमोद वानखेडे यांना मिळाली होती. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांना याबाबतची माहिती दिली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चासकर, पोलीस नाईक फंड,पोलीस नाईक वानखेडे,पोलीस शिपाई जाधव तसेच महिला पोलीस नाईक पाटील यांच्या पथकाने सदर लॉजवर १६ डिसेंबर रोजी दुपारी धाड टाकली. तेव्हा आरोपी सुरज साव (२६) हा असहाय्य महिलांच्या सहाय्याने या लॉजमध्ये अनैतिक व्यापार चालवित असल्याचे उघडकीस आले.

  • WATCH: Other story on Youtube 

मूळचा झारखंडचा रहिवासी असलेला आणि बेलापूर गावातच राहणाऱ्या आरोपी सुरज साव याच्याविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती तपास अधिकारी पृथ्वीराज घोरपडे यांनी दिली.

====================================================

  • मागील इतर बातम्यांवर दृष्टीक्षेप