आम्ही बजावला मतदानाचा हक्क

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क

नवीमुंबई: महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघांसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. पावसामुळे सकाळच्या सत्रात मतदानाची फारशी नोंद झाली नाही मात्र दुपारनंतर  मतदानासाठी रांगा दिसून आल्या. यामध्ये नवमतदार आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. राज्यात भाजपा- शिवसेना युती आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी हे पक्ष रिंगणात आहेत. महाराष्ट्रात एकूण 3,237 उमेदवार रिंगणात आहेत.  विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गुरूवार, दिनांक 24 ऑक्टोबर, 2019 रोजी सकाळी 8 वाजता  सर्व  विधानसभा मतदारसंघाच्या निश्चित  ठिकाणी होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातल्या 18 विधानसभा क्षेत्रात किरकोळ अनुचित प्रकार वगळता मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडली. जिल्ह्यात एकूण अंदाजे ५० टक्के मतदान झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. EVM व VVPAT बंद होण्याच्या काही तुरळक घटना झाल्या तेथे तातडीने नविन मशीन देण्यात आल्या. त्यानंतर मतदान पूर्ववत सुरळीत सुरू झाले. मतदान प्रक्रियेत कोठेही अडथळा निर्माण झाला नाही.

 

  • राज्यात एकूण  60.46 ‘% मतदान
  • कोल्हापूरमध्ये  सर्वात जास्त म्हणजे 73.62 % मतदान
  • ठाणे जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 47.91% मतदान

ठाणे शहर मतदार संघातील सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या मतदान केंद्रावर ठाण्यातील बहुजन नेते सुनील खांबे यांनी ईव्हीएम मशीनवर शाई फेकली. यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जवळपास 20 ते 25 मिनिटे थांबावावी लागली. पोलिसांनी बाळाचा वापर करून त्यांना मतदार केंद्राच्या बाहेर काढले. मात्र हा गोंधळ 15 ते 20 मिनिटे सुरू असल्याने 20 मिनिटे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबली होती . त्यानंतर पुन्हा मतदान सुरू करण्यात आले .

नवी मुंबई : नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा क्षेत्रात ११ उमेदवार असून बेलापूर मधून १७ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. ऐरोलीत 42.51 टक्के तर बेलापूरमध्ये 45.16 टक्के मतदान झाले. दोन्ही मतदारसंघातील मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही.  जवळपास 7 ते 8 टक्यांनी मतदानाची आकडेवारी घटल्याचं समोर आलं आहे. २०१४ सालच्या निवडणुकीत ऐरोली मतदारसंघातून ५१ टक्के तर बेलापूर मतदारसंघातून ४९ टक्के मतदान झाले होते. त्यामुळे प्रमुख पक्षाच्या उमेदवारांची चिंता वाढली आहे.

ऐरोली मतदारसंघ

  • एकूण मतदान- 42.51 %
  • 4,61,349 पैकी 1,96,128 मतदारांनी मतदान केले.
  • पुरुष मतदान – 2,63,781 पैकी 1,12,712
  • स्त्री मतदान – 1,97,536 पैकी 83,410
  • तृतीयपंथी मतदान – 32 पैकी 06

 

बेलापूर मतदारसंघ

 

  • एकूण मतदान-45.16%
  • 3,85,882  पैकी 1,74,283 मतदारांनी मतदान केले.
  • पुरुष मतदान- 2,08,125 पैकी  9,66,68 मतदारांनी मतदान केले.
  • महिला मतदार- 1,77,753 पैकी 7,7,615  मतदारांनी मतदान केले.
  • इतर मतदार- 4

ठाणे शहर मतदार संघातील सिव्हिल हॉस्पिटलच्या बाजूला असलेल्या मतदान केंद्रावर ठाण्यातील बहुजन नेते सुनील खांबे यांनी ईव्हीएम मशीनवर शाई फेकली. यामुळे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया जवळपास 20 ते 25 मिनिटे थांबावावी लागली. पोलिसांनी बाळाचा वापर करून त्यांना मतदार केंद्राच्या बाहेर काढले. मात्र हा गोंधळ 15 ते 20 मिनिटे सुरू असल्याने 20 मिनिटे या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया थांबली होती . त्यानंतर पुन्हा मतदान सुरू करण्यात आले .

पनवेल मतदारसंघ

रायगड जिल्ह्यातल्या पनवेल तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 56 % टक्के मतदानाची नोंद झाली.  खारघर, तळोजा, कामोठे, रोडपाली या भगातल्या नागरिकांनी पाणी नाही तर मतदान नाही हा पवित्रा ठेवला होता. त्यामुळे या भागातून मतदान कमी झाल्याचे बोलले जात आहे.

 

=======================================

इतर बातम्यांचाही मागोवा