नवी मुंबईत 244 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,  8 मे 2024

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्याप्रमाणेच पर्यावरणाला हानीकारक असणा-या प्लास्टिक प्रतिबंधाकडेही विशेष लक्ष देण्याचे निर्देश आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आढावा बैठकीत दिले आहेत. या अनुषंगाने परिमंडळ 2 च्या प्लास्टिक विरोधी विशेष भरारी पथकाने उपआयुक्त  चंद्रकांत तायडे यांच्या नियंत्रणाखाली ऐरोली सेक्टर 8 ए येथे प्रतिबंधात्मक प्लास्टिक वितरण करणा-या एका टेम्पोवर धाड टाकत साधारणत: 225 किलो प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त केला तसेच संबंधितांकडून 5 हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

NEWS : जागतिक हास्य दिनानिमित्त विशेष कार्यक्रमात स्वच्छतेचा जागर

अशाच प्रकारे 1 मे पासून आठवड्याभरात बेलापूर विभागात 3 व्यावसायिक / आस्थापनांवर कारवाई करीत 15 हजार दंडात्मक रक्कम व 10 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. वाशी विभागात एका व्यावसायिकावर  कारवाई करीत 5 हजार दंडात्मक रक्कम व 1 किलो एकल वापर प्लास्टिकची जप्ती केली.

NEWS : आता पुढे काय ?…

कोपरखैरणे विभागातही एका दुकानदाराकडून 5 हजार दंड वसूली व दीड किलो प्लास्टिक जप्ती करण्यात आली. परिमंडळ 1 च्या प्लास्टिकविरोधी भरारी पथकाने एका व्यावसायिकावरील कारवाईत 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 1 किलो एकल वापर प्लास्टिकचा साठा जप्त केला. तसेच परिमंडळ 2 च्या भरारी पथकाने 4 व्यावसायिकांवर कारवाई करीत 20 हजार दंड वसूली आणि 230 किलो 600 ग्रॅम इतके प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त केले आहे. अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आठवड्याभरात 10 दुकाने / आस्थापना यांच्याकडून 50 हजार इतकी दंडात्मक रक्कम वसूली तसेच 244 किलो 100 ग्रॅम प्रतिबंधात्मक प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे.

NEWS : भाजपची सावध खेळी

यापुढील काळातही नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ही प्लास्टिक वापर प्रतिबंधात्मक कारवाई अशीच सुरू राहणार असून नागरिकांनीही कापडी पिशव्यांच्या वापर सुरू करून आपल्या रोजच्या जगण्यातून पर्यावरणाला व मानवी जीवनाला धोका पोहचविणा-या एकल वापर प्लास्टिकचा वापर पूर्णपणे थांबवावा असे आवाहन करण्यात येत आहे.

NEWS : नवी मोर्चेबांधणी ?

या कारवाईत डी.आर.पाटील, वसंत बाविस्कर, महेश पाटील, अनिकेत म्हात्रे या महापालिका कर्मचा-यांनी चांगले काम केले.

========================================================


========================================================