सामाजिक कार्यकर्ते धनाजी खराडे यांच्याकडून गरजूंना धान्य वाटप

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २५ मार्च २०२०

सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यापार्श्वभूमीवर प्रत्येकजण आपापल्या परिने काळजी घेत असून सीबीडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते धनाजी खराडे यांनी सोसायट्यांमधील जीने तसेच परिसरात निर्जंतुकीकरणासाठी स्वखर्चाने औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. तसेच गरीब गरजूंना अन्नधान्याचे वाटप सुरु केल्यामुळे नागरिकांनी त्यांचे मनापासून आभार मानले.

 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन पातळीवर जोरदार प्रयत्न सुरु आहेत. शासनाच्या या प्रयत्नांना अनेक सामाजिक संस्था तसेच व्यक्तीगत पातळीवर अनेकांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

नोंदणीकृत रूग्णालये, वैद्यकीय व्यावसायिक, औषध दुकाने बंद राहिल्यास कारवाई
https://bit.ly/39irGYI

सीबीडी येथे राहणारे उच्चशिक्षित सामाजिक कार्यकर्ते धनाजी खराडे यांनी गृहनिर्माण सोसायट्यांचे गेट तसेच जिन्यांवर डेटॉल मिश्रित औषधांची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले. सुरक्षेचे नियम पाळून गर्दी न करता खराडे यांनी स्वतःहून सुरु केलेल्या या औषध फवारणीमुळे अनेक स्थानिक नागरिकही त्यांच्या मदतीला धावून आले. परिसरातील अधिकाधिक भागात औषधांची फवारणी करण्यावर भर देण्यात येणार असून आपल्याच घरातील लहान मोठी मंडळी सोसायटीत जिन्यावरून ये जा करीत असल्यामुळे त्यांना विषाणुची लागण होवू नये म्हणून आपण स्वखर्चाने औषधांची फवारणी करीत असल्याची माहिती समाजसेवक धनाजी खराडे यांनी दिली.

 

 

कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. लॉकडाउन केल्यामुळे लोकांच्या संचारावर बंधने आली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंसाठी गरीब नागरिकांनी परवड होण्याची भिती आहे. त्यामुळे खराडे यांनी परिसरातील गरंजूना डाळ,तांदूळ, तेल आदी जीवनावश्यक अन्नधान्य पुरविण्यासही सुरूवात केली आहे. सध्याच्या कठीण प्रसंगात आपल्याकडून लोकांसाठी जे करता येईल, ते करण्याचा आपला प्रयत्न आहे, त्यामुळे स्वच्छतेसोबतच गरजू आणि गरीब नागरिकांना अन्नधान्य स्वखर्चाने उपलब्ध करून देण्याचा आपण प्रयत्न करीत असल्याचे धनाजी खराडे यांनी सांगितले.

कोरोनाच्या प्रतिबंधासाठी नवीमुंबईत सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण
https://bit.ly/2WHE4ia

  • भाजी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न
टोमॅटो 25रू. किलो
कांदे 30 रू. किलो 
फ्लाॅवर 15 रू. किलो 
कोबी 15 रू. किलो 
बीन्स 30 रू. किलो
लाल भोपळा 20 रू.किलो 
शिमलामिर्ची 25 रू. किलो 
लिंबू 2रू. प्रति नग
कोथिंबीर 10 रू. जुडी
स्थळ :  ए-6-09, सेक्टर 2,सी.बी.डी
संपर्क –  9833406093
नवी मुंबईत नागरिकांना घराजवळच भाजीपाला उपलब्ध करून देणार
https://bit.ly/33PsyCJ

दरम्यान, कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी खाणावळी बंद झाल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या जेवणाची, औषधांची तसेच राहण्याची गैरसोय होत असल्यास गरंजूंना आपण शक्य तेवढी मदत करू, असे आवाहनही समाजसेवक धनाजी खराडे यांनी केले आहे. तसेच लोकांनी अतिशय गरज असेल तरच घराबाहेर पडावे आणि शासनाला सहकार्य करावे, असेही खराडे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा