तेजस्वी सोनी यांच्यातर्फे पोलिसांना , नागरिकांना मास्क, सॅनिटायजरचे वाटप

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ४ एप्रिल २०२०
सध्या कोरोनाच्या प्रादूर्भाव वाढत असतानाही २४ तास नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना नेरुळ येथील युवा सामाजिक कार्यकर्ते तेजस्वी सोनी यांच्यावतीने नुकतेच  मास्क आणि सॅनिटायजरचे वाटप करण्यात आले.
  • नवी मुंबईत नागरिकांना घराजवळच भाजीपाला उपलब्ध करून देणार
    https://bit.ly/33PsyCJ
कोरनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता पोलिसांवरील कामाचा ताण कमालीचा वाढला आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणुचा संसर्ग होवू नये यासाठी नेरुळ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मोफत मास्क आणि सॅनिटायजरचे वाटप केल्याची माहिती तेजस्वी सोनी यांनी दिली.

 

कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे निष्पाप लोकांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे नागरिकांना शक्य तेवढी मदत करण्याच्या उद्देशाने प्रभाग क्रमांक ९१ मधील नागरिकांनाही घरोघरी जावून  मास्क आणि सॅनिटायजरचे मोफत वाटप करण्यात आले.
सध्याच्या कठीण परिस्थितीत नागरिकांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा असो वा आरोग्य सेवा मिळण्यात अडचणी येत असल्यास संपर्क साधल्यास आपण त्वरीत मदत उपलब्ध करून देवू, असे आवाहन तेजस्वी सोनी यांनी केले आहे.
=======================================================
  • इतर बातम्यांचाही मागोवा