सन्नी चॅरिटेबल ट्रस्टचे अपोलो रुग्णालयाला साकडे

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,४  एप्रिल २०२०

सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असून बेलापूर नोड १ मध्ये असणाऱ्या झोपडपट्टीमध्या राहणाऱ्या गरीब नागरिकांसाठी मास्क आणि सॅनिटायजर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी नेरुळ येथील सामाजिक कार्यकर्ते सन्नी वालिका यांनी अपोलो रुग्णालयाकडे केली आहे.

सन्नी वालिका यांनी सन्नी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पत्रव्यवहार करून अपोलो रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना मदतीसाठी साकडे घातले आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १०१ मध्ये दोन झोपडपट्ट्या आहेत. या झोपडपट्ट्यांमध्ये गरीब कुटुंबे राहत आहेत. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव पाहता या नागरिकांच्या आरोग्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. सन्नी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने या नागरिकांना मदत मिळावी यासाठी प्रयत्न केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून अपोलो रुग्णालयाच्या प्रशासनाला निवेदन देवून मास्क आणि सॅनिटायजर उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती केल्याची माहिती वालिका यांनी दिली.

  • नवी मुंबईत नागरिकांना घराजवळच भाजीपाला उपलब्ध करून देणार
    https://bit.ly/33PsyCJ

========================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा