कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दशरथ भगत यांनी सूचवला ठोस कार्यक्रम

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांना दिले विस्तृत निवेदन

नवी मुंबईकरांना आरोग्यविषयक सेवासुविधा त्वरीत उपलब्ध करून देण्याची मागणी 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, २७ जून २०२०

नवी मुंबई शहरात सध्या कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. महापालिका प्रशासन तसेच इतर यंत्रणा आपापल्यापरिने काम करीत असले तरी कोरोनाचा प्रभाव रोखण्यास म्हणावे तसे यश येताना दिसत नाही. त्याचा सर्वाधिक मोठा फटका नवी मुंबईतील सामान्य जनतेला बसत आहे. यापार्श्वभूमीवर नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची २६ जून रोजी नवी मुंबई दौऱ्यात भेट घेवून सविस्तर निवेदन दिले. दशरथ भगत यांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि त्याबाबत सुचविलेल्या उपाययोजनांबाबत दरेकर यांनी समाधान व्यक्त केले आणि त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाला सूचना केल्या.

नवी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांनी केलेल्या सूचना
  • कोरोनासाठीच्याSwab Test या पूर्णत: मोफत आणि किमान 24 तासांत रिसल्ट येतील अश्या पारदर्शक व्हाव्यात.
  • आजमितीस शहरात कोरोना व इतर रुग्णांस अत्यावश्यक असलेली व्हेंटीलेटर्स सुविधा अत्यंत कमी आहे. या उणिवेपोटी अनेक  नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत ,म्हणून व्हेंटीलेटर्स सुविधा मोठ्या संख्येने उपलब्ध करावी .
  • नागरिकांना तत्पर व सुलभ आरोग्यसेवा व उपचार मिळावेत यासाठी प्रत्येक विभागात मतदान केंद्र किंवा १११ वॉर्ड निहाय आरोग्य केंद्र (OPD) सुरु करावेत.
  • ज्या रुग्णाला कोरोना सदृश्य लक्षणे आहेत परंतु त्याचा निगेटिव्ह अथवा पॉझिटिव्ह असा अहवाल नाही अशा नागरिकांना कोविड -१९ रुग्णालये आणि नॉन कोविड -१९ रुग्णालये यांच्या मध्ये उपचार नाकारला जात आहे, अश्या नागरिकांना उपचारांपासून वंचित न ठेवता त्वरित उपचार चालू करावेत.
  • शहरात कोरोना काळात बंद असलेल्या तसेच चालू असलेल्या खाजगी हॉस्पिटल्स आणि क्लीनिक मधील डॉक्टरांना सक्तीने  पालिकेच्या आरोग्य विभागात क्षेत्रीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सेवा देण्यास बंधनकारक करावे तसे न करण्याऱ्या डॉक्टरांचे  व खाजगी हॉस्पिटलांचे आरोग्य सेवा परवाने बाबत विचार करावा.
  • प्रत्येक रुग्णाला अर्थात कोविड व इतर आजारी रुग्णास त्वरित हॉस्पिटल मध्ये प्रवेश मिळावा.
  • पालिकेने प्रथमतः स्वतःच्या कर्तव्याची जबाबदारी जाणुन घेवून एकही रुग्णास वणवण उपचार व जीव वाचवण्यासाठी भटकू  न देता  उपचारासाठी असलेल्या यंत्रणांना ट्रॅकर सिस्टिमद्वारे नियंत्रित करावे.
  • २३ मे २०२० रोज़ीच्या शासन निर्णयानुसार सामान्य रुग्णांकरिता सर्व खाजगी हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजने अंतर्गत उपचार चालू व्हावेत.
  • सी.टी.स्कॅन द्वारा टेस्टेड कोविडस्कोप निष्कर्ष कोविड पॉज़िटिव म्हणुन मान्य करावे.
  • काही रिकामे असलेली खाजगी रुग्णालये पालिकेने पूर्ण अंगीकृत करून घ्यावीत.
  • महाराष्ट्रातील काही ज़िल्हे अल्प करोना बाधित आहेत तेथील डॉक्टर आणि नर्स मागवुन घ्यावेत.
  • पोलीस व त्यांचे कुटुंबीय यांना महापालिकेने स्वतःच्या अखत्यारीतील आरोग्य, अग्निशमन विभाग व इतर विभागांप्रमाणे विशेष सुरक्षा घटक म्हणून सुरक्षा कवच द्यावे तसेच सर्व शहरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दैनंदिन कार्यालयीन साधन सामुग्री उपलब्ध  करावी कारण पोलीस हे देखील महापालिका क्षेत्रातील विशेष घटकच आहे.
  • पालिकेचे काही उपलब्ध असलेले स्वताचे हॉस्पिटल पूर्ण क्षमतेने चालू करावेत.
  • सद्यस्थितित सामान्य नागरिकांकडे पैसे नाहीत . म्हणुन दिनांक ३१ डिसेंबर २०१९ रोज़ी खाजगी रुग्णालयांकरिता निश्चितकरण्यात आलेल्या दरात ७५ % दर कमी करावे आणि नवीन अल्प दर लागू करावेत.
  • रहिवासी क्षेत्रात असलेले विविध खाजगी रुग्णालये (तपासणी,उपचार व बेड सुविधा असलेले) यांना कोरोनात्तरआजारांसाठी शासनाच्या मदतीने संपूर्ण सक्षमपणे कसे सुरू करता येतील याबाबत शीघ्र निर्णय घेऊन ही सेवा पूर्ववत करावी.
  • कॉरंटाईन व आयसोलेशन बाबत सरकारी यंत्रणांना सहकार्य व्हावे आणि सादर रुग्णांचा उपचार आरामदायीच आणि प्रसन्न वातावरणात व्हावा जेणेकरून ते लवकर बरे होतील याकरिता मोटमोत्या निवासी संकुलांतीळ क्लब हाऊस  किंवा अन्य सुरक्षित जागांवर त्यांच्याच देखरेखीखाली प्रशासनाच्या अटी शर्तीनुसार कॉरंटाईन व आयसोलेशन सेंटर्स उभा रहावेत ज्यावर मनपा क्षेत्रीय डॉक्टर्स व त्यांचे सपोर्टींग टीम यांचे देखरेखीखाली नजीकडे हॉस्पिटलचे मार्गदर्शनाखाली आणि साधन सामुग्री यांची मदत घ्यावी.
  • नवी मुंबई शहरात रुग्णवाहिकांची संख्या वाढ़वावीच तसेच समाजसेवकांसाठी त्यांच्याकडील रुग्णवाहिकांद्वारे कोविड-19साठी पुढे येण्यासाठी काही अटीशर्थी निश्चित करून आवाहन करावे.
  • नागरिकांच्या खाजगी आणि वैद्यकीय महाविद्यालयातील अवास्तव उपचार बिलाचा भरणा पालिका, सिडको आणिMIDC यांनी करावा.
  • नवी मुंबईतीलMIDC TTC एरियात MIDC ने देखिल या प्रक़ोपात नवी मुंबई नागरिकांच्या आरोग्याची काही जबाबदारी घ्यावी/उचलण्यासाठी सहकार्य करावे.
  • या शहराचे शिल्पकार सिडको या आस्थापनाने नवी मुंबईतील नागरिकांच्या आरोग्याविषयक या भयंकर महामारीच्याप्रक़ोपात जबाबदारी नाकारणे योग्य आहे का ? वा कसे? यावर विचार व्हावा.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील  कोरोना प्रकोपातील कोरोना रुग्ण आणि इतर आजारांचे रुग्ण यांच्यावरील उपचारांबाबत सद्यपरिस्थिती, आणि त्यासंदर्भातील सूचनांबाबत शहरातील नागरिकांचे जीव वाचविणे तसेच त्यांस आर्थिक खाईत न जाऊ देणे याअनुषंगानेच सहानुभूतीपूर्वक दिशेने ऊचित विचार करावा.आलेल्या सामाजिक संकटाच्या जाणिवेने नवी मुंबईतील सर्वसामान्य नागरिक स्वयंस्फूर्तीने  “We Need Oxygen “ या  घोषवाक्यनिशी “Oxygen Movement  For Save lifes by Hospital Treatment यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करून चळवळ उभी करण्याची शक्यता नाकारता येत नाही,ज्यामुळे क़ायदा व सुव्यवस्था बिघडण्याची वेळ येऊ नये. याचसाठी आपण व अन्य प्रशासकीय आस्थापने यांना सोबत घेऊन कोरोना प्रकोपाचे निर्मूलनासाठी व अर्थव्यवस्थेवर त्वरित उपाय व नियोजन उचित  व्हावे अशी नागरीकांची तीव्र इच्छा असल्याचेही दशरथ भगत यांनी यावेळी सांगितले.

==================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा