रविवारी मेन आणि हार्बरवर मेगाब्लॉक

मुंबई, 18 मार्च 2017/AV News Bureau:

रेल्वे मार्ग तसेच इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावर येत्या रविवारी, 19 मार्च रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

मेन लाइन

ठाणे-कल्याण डाउन फास्ट मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 पर्यंत

  • सकाळी 9.38 ते दुपारी 2.45 या काळात मुंबई सीएसटीहून सुटणारी डाउन फास्ट आणि सेमी फास्ट गाड्या ठरलेल्या थांब्यांव्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबणार आहे. ठाणे आणि कल्याण स्थानकांच्या दरम्यान डाउन मार्गावर सर्व गाड्या 20 मिनिटे उशिरांनी धावणार आहेत.
  • सकाळी 10.46 ते दुपारी 3.18 या काळात ठाण्याहून सुटणाऱ्या अप फास् आणि सेमी फास्ट गाड्या ठरलेल्या थांब्यांव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबणार आहेत. त्यामुळे या गाड्या 15 मिनिटे उशिरा धावणार आहेत.
  • सकाळी 11 ते सायंकाळी 5 या काळात सीएसटीहून सुटणाऱ्या आणि पुन्हा सीएसीटीकडे जाणाऱ्या सर्व गाड्या 10 मिनिटे उशिरा धावणार आहेत.

हार्बर लाइन

पनवेल-नेरुळ अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 4.20 या काळात

  • सकाळी 11.14 ते दुपारी 4.15 या काळात सीएसटी ते पनवेल/बेलापूरला जाणाऱ्या आणि सकाळी 11.01 ते दुपारी 4.26 या काळात बेलापूर/पनवेल येथून सीएसटीला जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
  • सकाळी 11.04 ते दुपारी 3.53 या काळात पनवेलहून ठाण्याला जाणाऱ्या आणि सकाळी 10.42 ते दुपारी 4.4 या काळात नेरूळहून पनवेलला जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
  • मेगाब्लॉकदरम्यान पनवेल-अंधेरी मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
  • मेगाब्लॉकच्या काळात सीएसटी- नेरुळ आणि ठाणे- नेरुळ या मार्गावर विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे.