सीवुडमध्ये  महिला कोरोना योद्धय़ांचा सत्कार

भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांचा पुढाकार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १३ नोव्हेंबर २०२०

कोरोनाच्या सुरुवातीच्या लॉकडाउन काळात घराबाहेर पडण्यास बंदी असताना आपल्या आरोग्याची पर्वा न करता सोसायटीतील रहिवाशांना जीवनावश्यक वस्तू पोहोचविण्याच्या कामात सक्रीय मदत करणाऱ्या सीवुड परिसरातील ५० पेक्षा जास्त महिलांचा भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव आणि माजी नगरसेविका कविता भरत जाधव यांनी कौटुंबिक सोहळ्यात भेट वस्तू देत सत्कार केला.

आपल्या जिवाची पर्वा न करता आमच्यासोबत संपूर्ण सीवूड्स विभागातील 50 पेक्षा जास्त माता-भगिनी आपल्या सोसायटी मधील किंवा आसपासच्या परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक सेवे मध्ये भाजीपाला, फळे, धान्य किंवा इतर जीवनावश्यक वस्तू गेटपोच करण्याकरिता मदत केली.त्यांच्या मदतीशिवाय जीवनावश्यक वस्तू घरपोच करण्याच्या आमच्या कामाला गती मिळाली नसती. त्यांच्या या अविरत सेवेचे कौतूक करण्यासाठी हा घरगुती सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती भरत जाधव यांनी दिली.

कोरोना काळात सीवुड, नेरुळ परिसरातील नागरिकांना भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तू सोसायटीच्या गेटपर्यंत ना नफा ना तोटा तत्वावर उपलब्ध करून देण्यात आला होता. या कार्यासाठी भरत जाधव यांनी राज्याच्या विविध भागात जावून स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून भाजीपाला, धान्य तसेच इतर वस्तू नागरिकांना माफक दरात उपलब्ध करून दिल्या होत्या. भरत जाधव यांच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा कृषी माल विकला जावून त्यांनाही मदत मिळाली होती. भरत जाधव यांच्या या कार्याचा विविध स्तरातून कौतूक करण्यात आले होते.

==============================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा

  • सीवुडमधील कोरोना योध्यांना नव्या कोऱ्या स्कूटींची भेट
  • https://bit.ly/3km2eHa