नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या 102 दगडखाणी पुन्हा सुरू होणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 23 जून 2021:

हरित लवादाच्या कारवाईमुळे बंद असलेल्या नवी मुंबईतील 102 दगडखाणी पुन्हा सुरू होणार आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको आणि प्रकल्पग्रस्त दगडखाण मालकांच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.  राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे 35 ते 40 हजार लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटणार आहे. हा निर्णय घेतल्याने दगडखांणी संदर्भात असलेल्या सर्व घटकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मागील पाच वर्षांपासून हरित लवादाच्या कारवाई मुळे या दगडखाणी बंद होत्या. दगडखाणी बंद असल्याने 35 ते 40 हजार लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला होता. गेल्या 5 वर्षांपासून प्रतिक्षेत असलेले हे प्रकरण अखेर मार्गी निघाल्यामुळे दगडखांणी मालक आणि कामगारांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयात महत्वाची भूमिका बजावणारे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, नरेश गौरी , पंडित पाटील ,हरिश्चंद्र घरत, निलेश केकावत , दिलीप मढ़वी , प्रमोद घरत , विलास जाधव , सोनू ज़ूनेजे , प्रवीण लाड़ ,मनोज पाटील  , भरत भाई, साईनाथ पाटिल यांच्या शिष्टमंडळाने भेट घेवून त्यांचे आभार मानले.

——————————————————————————————————