देशात 93.4 लाख मुले अतिकुपोषित

पोषक आहार पुनर्वसन केंद्रांमध्ये बालकांची नोंदणी      

नवी दिल्ली, 11 एप्रिल 2017:

देशातील 25 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतर्गत एकूण 966 पोषक आहार पुनर्वसन केंद्रे सक्रीय आहेत. राष्ट्रीय कौटुंबीक आरोग्य सर्वेक्षणानुसार सुमारे 93.4 लाख मुले अतिकुपोषित (children malnutrition)आहेत. यापैकी 10 टक्के मुलांना या केंद्रांमध्ये दाखल करण्याची आवश्यकता असल्याची माहिती आरोग्य राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात दिली.

 एप्रिल 2015 ते मार्च 2016 या अवधित महाराष्ट्रात एकूण 35 पोषक आहार पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यात 3,489 बालकांना दाखल करण्यात आले आहे. मध्य प्रदेशात सर्वाधिक 315 पोषक आहार पुनर्वसन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यात 79,527 बालकांना दाखल करण्यात आले आहे.

देशभरात 2015-16 या वर्षात या पोषक आहार पुनर्वसन केंद्रांमध्ये एकूण 1,72,902 बालकांना दाखल करण्यात आले. त्यापैकी 92,760 बालके कुपोषित गटातून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली,असेही कुलस्ते यांनी आपल्या उत्तरात सांगितले.