नवी मुंबईत युवासेनेच्या संवाद मेळाव्याला शिवसैनिकांची गर्दी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 30 ऑक्टोबर 2021

युवासेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला पदाधिकारी संवाद मेळावा नवी मुंबईत आज मोठ्या उत्साहात आणि भगव्या जल्लोषात पार पडला. या मेळाव्याला हजारो शिवसैनिक आणि युवासैनिक उपस्थित राहिल्यामुळे वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृह गर्दीने तुडंब भरले. पुढील काही महिन्यांत होणाऱ्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या या संवाद मेळाव्याने इतर राजकीय पक्षांचे लक्ष वेधून घेतले.

यावेळी खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, द्वारकानाथ भोईर, युवासेना कोअर कमिटी सदस्य रुपेश कदम, योगेश निमसे, जिल्हासंघटक रंजना शिंत्रे, पुनम आगवणे, माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, एम.के. मढवी, शहरप्रमुख विजय माने, प्रवीण म्हात्रे, करण मढवी आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात चेतन नाईक, मयुर ब्रीद, सिध्दराम शिलवंत, मेघाली राऊत यांनी आपले विचारे व्यक्त केले. कोविड वॉर्डमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या प्रतिक्षा माने यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

आमागी निवडणुकीत पालिकेवर शिवसेना महाविकास आघाडीचेच वर्चस्व राहणार आहे, असा विश्वास युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

  • कोरोनात फक्त शिवसैनिकच रस्त्यांवर

शिवसेना ही स्वार्थ डोळ्यासमोर ठेवून काम करीत नाही. कोरोना महामारीमध्ये सर्वसामान्य नागरिकांना मदत करण्यासाठी शिवसैनिक आणि युवासैनिकच रस्त्यावर दिसत होते. फक्त रुग्णांना मदतच नाही तर रक्तदान करण्यातही शिवसेना आघाडीवर होती, असे प्रतिपादन खासदार राजन विचारे यांनी यावेळी केले.

  • भाजप मित्रांचा घात करणारा पक्ष

भाजप हा पक्ष फक्त लबाड आणि कपटीच नाही तर मित्रांचा घात करणारा पक्ष आहे. या पक्षाची महाराष्ट्रातील ताकद संपली आहे. त्यामुळे आता त्यांना ईडी आणि सीबीआयचा आधार घ्यावा लागत आहे. फक्त दशहत निर्माण करण्याचे काम आता भाजपच्या माध्यमातून सुरु आहे, अशी टिका यावेळी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी केली.

===============================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप