भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत विविध उपक्रम

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 6 डिसेंबर 2023

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे दादर येथील शिवाजी पार्क येथे माहिती व प्रसिद्धी स्टॉल व भोजन स्टॉल उभारण्यात आलेला आहे, सदर माहिती स्टॉलचे उद्घाटन दिनांक 05 डिसेंबर 2023 रोजी प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण मुंबई विभाग वंदना कोचुरे यांच्या हस्ते झाले.

यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी व विविध महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते सदर माहिती स्टॉलमध्ये सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती पुस्तिका मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच सामाजिक न्याय विभागाअंतर्गत विविध महामंडळे कार्यरत आहेत सदर महामंडळाच्या योजनांची माहिती पुस्तिका ही मोफत वाटप करण्यात येत आहे.

सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्यावतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यासाठी भोजन स्टॉल उभारण्यात आला असून सदर स्टॉलवर भोजनाचा एक बॉक्स व एक पाणी बॉटल याचे वाटप करण्यात येत आहे. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांच्या वतीने पुस्तक स्टॉल उभारण्यात आलेला आहे.

बातमी वाचा : ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन

सदर पुस्तक स्टॉलवर बार्टीच्या विविध उपक्रमांची पुस्तके देण्यात उपलब्ध आहेत. सदर माहिती व प्रसिद्धी स्टॉलमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले व राजर्षी छत्रपती शाहू महाराज इत्यादी महापुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित पुस्तके उपलब्ध आहेत आणि या सर्व पुस्तकांवर ८५% इतकी सूट देण्यात आलेले आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या माहिती व प्रसिद्धी स्टॉलला व मोफत भोजन स्टॉलला भेट द्यावी असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण, मुंबई विभाग वंदना कोचुरे यांनी केले आहे.

बातमी वाचा : राज्यातील दुष्काळ निवारण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

========================================================

========================================================