14 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 13 ऑगस्ट 2022

    विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मध्य रेल्वेतर्फे आपल्या उपनगरीय विभागांवर 14 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – विद्याविहार दरम्यान अप आणि धीम्या मार्गावर सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.49 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकावर थांबतील आणि पुढे डाउन धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

घाटकोपर येथून सकाळी 10.41 ते दुपारी 3.52 पर्यंत  सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.

 कुर्ला- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 या वेळेत सुटणारी पनवेल/बेलापूर/वाशी करीता जाणारी हार्बर मार्गावरील सेवा आणि वाशी/बेलापूर/पनवेल येथून सकाळी 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

दरम्यान,, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कुर्ला आणि वाशी- पनवेल स्थानकांदरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गे (ठाणे-वाशी/नेरुळ) सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत प्रवास करण्याची परवानगी आहे.

हे मेंटेनन्स मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत.  प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.  प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.