पनवेलमधील काँग्रेस भवन येथे स्वातंत्र्यदिनाचाअमृत महोत्सव उत्साहात साजरा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • पनवेल, 15 ऑगस्ट 2022

भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त, कै. चापशी पुरुषोत्तम रवासिया काँग्रेस भवन पनवेल येथे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते अखिल अधिकारी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण उत्साहात पार पडले. त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त मार्गदर्शनपर भाषण केले.

यावेळी पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष अभिजित पाटील, जेष्ठ नेते अशोक (आबा) खेर, माजी जि. प अध्यक्ष अनंत पाटील, पनवेल शहर जिल्हा महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, शशिकांत बांदोडकर, पनवेल शहर जिल्हा सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, अॅड. के. एस. पाटील, अॅड.  अरुण कुंभार, नवीन पनवेल शहर अध्यक्ष राहुल जानोरकर, आदम ढालाईत, वैभव पाटील, रेमंड गोवियस, प्रताप गावंड, लतीफ नालखंडे,  विनोद इंगोळे, आरती ठाकूर, अनुपमा चुढा, नीता शेणोय, अंजुम तेरवा, शाहीद मुल्ला, राजाभाऊ दवे,  काशिनाथ जाधव आदी नेते व कार्यकर्ते हजर होते.