केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 15 ऑगस्ट 2022

केंद्रीय राखीव पोलीस दल पश्चिम सेक्टर, नवी मुंबई, आणि 102 रॅपिड टास्क फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून रणदीप दत्ता पीएमजी, पोलिस महानिरीक्षक, पश्चिम सेक्टर, केंद्रीय राखीव पोलीस दल यांनी क्वार्टर गार्ड येथे तिरंगा ध्वज फडकवला. या दिवसाचे महत्त्व सांगताना सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या,तसेच इतर शौर्यपदक विजेत्यांची नावेही यावेळी वाचून दाखवली आणि ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी चंद्र भूषण, पुलिस उप महानिरीक्षक, पश्चिमी सेक्टर, पी.सी. झा, पीएमजी, पोलीस उप महानिरीक्षक पश्चिमी सेक्टर,  प्रवीणकुमार चन्द्रकान्त घाग, उप महानिरीक्षक, रेंज द्रुकाब,  .बी.एस. सिद्धू, कमाण्डेन्ट,पश्चिमी सेक्टर यांच्यासह पश्चिमी सेक्टर मुख्यालय केंद्रीय राखीव पोलीस दल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. मिठाई वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.