गणेशोत्सवासाठी मुंबई ते कुडाळ, सावंतवाडीदरम्यान 6 आणखी विशेष गाड्या

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 13 ऑगस्ट 2022

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची वाढती संख्या लक्षात घेवून मध्य रेल्वेने मुंबई ते कुडाळ आणि सावंतवाडीदरम्यान आणखी 6 विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे आरक्षण 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

यापूर्वी गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर 206  गणपती विशेष गाडया सोडण्यात आलेल्या आहेत. या नवीन विशेष गाड्यांमुळे एकूण गाड्यांची संख्या 212  इतकी होणार आहे.

मुंबई- कुडाळ गणपती स्पेशल

  • गाडी क्रमांक 01167  ही विशेष गाडी 24 ऑगस्ट रोजी रात्री 12.45 ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11 वाजता कुडाळ स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01168  ही विशेष गाडी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कुडाळहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.55  ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे

या विशेष गाडयांना ठाणे, पनवेल, रोहा, माणाव, खेड. चिपळुण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापुर, वैभववाडी, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना 18 स्लीपर डबे जोडण्यात येणार आहेत. तसेच आणखी 2  सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहेत.

पनवेल- कुडाळ गणपती स्पेशल

  • गाडी क्रमांक 01169  ही विशेष गाडी 25 ऑगस्ट रोजी रात्री 12.10 ला पनवेलहून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 9 वाजता कुडाळ स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01170  ही विशेष गाडी 24 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता कुडाळहून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.55  ला पनवेलला पोहोचेल.

गाडीचे थांबे

या विशेष गाडयांना रोहा, माणाव, खेड. चिपळुण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापुर, वैभववाडी, कणकवली आणि सिंधुदुर्ग स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना 18 स्लीपर डबे जोडण्यात येणार आहेत. तसेच आणखी 2  सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहेत.

मुंबई- सावंतवाडी गणपती स्पेशल

  • गाडी क्रमांक 01171  ही विशेष गाडी 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4.55 ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजता सावंतवाडी स्थानकात पोहोचेल.
  • गाडी क्रमांक 01172  ही विशेष गाडी 26 ऑगस्ट रोजी पहाटे 4.40  वाजता कुडाळहून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5 ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

गाडीचे थांबे

या विशेष गाडयांना ठाणे, पनवेल, रोहा, माणाव, खेड. चिपळुण, सावर्डे, आरवली, संगमेश्वर, रत्नागिरी, आडिवली, विलवडे, राजापुर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली आणि सिंधुदुर्ग, कुडाळ स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

डब्यांची रचना

या विशेष गाड्यांना 9 स्लीपर डबे, 7 अनारक्षित सेकंड क्लास सिटींग जोडण्यात येणार आहेत. तसेच आणखी 2  सामान आणि गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहेत.