• Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Search
27 C
Navi Mumbai
Sunday, June 15, 2025
Marathi News
  • Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Home ठळक बातम्या केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची 8 यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी
  • ठळक बातम्या

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची 8 यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी

By
Siddharth Haralkar
-
August 18, 2022
Share on Facebook
Tweet on Twitter

भारताची राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती पसरवल्याबद्दल कारवाई

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 18 ऑगस्ट 2022 :

भारताचे सार्वभौमत्व आणि  अखंडता, देशाची सुरक्षितता, भारताचे परराष्ट्रांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध आणि देशातील सार्वजनिक सुव्यवस्था यांच्या दृष्टीने हानिकारक मजकूर प्रसारित करत असल्याचे आढळून आल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने,  यूट्यूब वरील 8 वृत्तवाहिन्या आणि 1 फेसबुक खाते बंद करण्यासाठी तसेच फेसबुकवरील दोन पोस्ट हटविण्यासाठी 16 ऑगस्ट 2022 रोजी आदेश जारी केले आहेत. या 8 वृत्तवाहिन्यांपैकी 7 भारतीय तर 1 पाकिस्तानस्थित यूट्यूब वाहिनी आहे. माहिती तंत्रज्ञान नियम, 2021 नुसार देण्यात आलेल्या आपत्कालीन परिस्थितीतील अधिकारांचा वापर करत ही कारवाई करण्यात आली आहे. बंदी घालण्यात आलेल्या या यू ट्यूब वाहिन्यांची एकूण प्रेक्षकसंख्या 114 कोटींहून अधिक होती आणि या वाहिन्यांसाठी 85 लाखांहून अधिक वापरकर्त्यांनी  नोंदणी केली होती.

माहितीचे विश्लेषण

भारतातील काही यूट्यूब वाहिन्यांद्वारे प्रसारित झालेल्या माहितीतून विविध धार्मिक समुदायांच्या सदस्यांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. बंदी घालण्यात आलेल्या यू ट्यूब वाहिन्यांवरील विविध व्हिडीओमध्ये चुकीचे दावे करण्यात आले होते. उदाहरण घ्यायचे तर, भारत सरकारने काही धार्मिक वास्तू पाडून टाकण्याचे आदेश दिले आहेत; भारत सरकारने काही धार्मिक सण साजरे करण्यावर बंदी घातली आहे किंवा देशात धार्मिक युद्ध जाहीर केले आहे इत्यादी चुकीच्या बातम्या सांगता येतील. अशा मजकूरामुळे देशात सामाजिक तेढ निर्माण होण्याची आणि सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता असल्याचे आढळून आले आहे.

भारतीय सशस्त्र दले, जम्मू-कश्मीर आदींबाबत खोट्या बातम्या प्रसारित करण्यासाठी देखील  या यू ट्यूब वाहिन्यांचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. या बातम्यांचा मजकूर संपूर्णतः चुकीचा तसेच देशाची राष्ट्रीय सुरक्षा आणि  भारताचे परराष्ट्रांशी असलेले मैत्रीपूर्ण संबंध यांच्या दृष्टीकोनातून संवेदनशील असल्याचे आढळून आले आहे.

वृत्तनिवेदकांची  बनावट छायाचित्रे आणि थंबनेल्सचा वापर 

यू ट्यूब वाहिन्यांवर बंदी घालण्यात आली आहे, ती विशिष्ट दूरचित्रवाणी वाहिनीवरून दिल्या जाणा-या बातम्या अधिकृत आणि ख-या आहेत, असे भासवून प्रेक्षकांची दिशाभूल करण्यासाठी वृत्तनिवेदकांची  बनावट छायाचित्रे आणि संवेदनशील लघुप्रतिमा (थंबनेल्स) तसेच वाहिन्यांचे लोगो वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

मंत्रालयाने बंदी घातलेले सर्व यू ट्यूब चॅनल्स सामाजिक सलोखा, सार्वजनिक सुव्यवस्था आणि भारताच्या परराष्ट्र संबंधांना घातक ठरतील असा चुकीचा आशय असलेल्या जाहिराती त्यांच्या चित्रफितींमधून दाखवत होते. यासह, डिसेंबर 2021 पासून, मंत्रालयाने आतापर्यंत 102 यू ट्यूब आधारित वृत्त वाहिन्या आणि इतर अनेक समाजमाध्यमांवरील अकांऊंट्स ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.

——————————————————————————————————

0
0
  • TAGS
  • indian-gov-blocking-of-8youtube-based-news-channels-1-facebook-account
SHARE
Facebook
Twitter
  • tweet
Previous articleहरिहरेश्वरच्या किना-यावर संशयास्पद बोटीत एके 47 रायफल्स
Next articleदहीहंडी निमित्त ठाण्यातील वाहतुकीत मोठे  बदल
Siddharth Haralkar

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

ठळक बातम्या

१२ जून रोजी काँग्रेसचे राज्यभर मशाल मोर्चे

ठळक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय आवारात सुरंगी वृक्षरोपांची लागवड

ठळक बातम्या

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; वाहतूक बंद; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं पोलिसांचं आवाहन

News Archives

MOST POPULAR

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक: जमीन अधिग्रहण संदर्भात जनतेला अद्ययावत माहिती द्या

December 7, 2022

जुईनगर येथे रेल्वे वसाहतीत नागरी कामे सुरू

December 26, 2016

सुरक्षा रक्षकाने प्रसंगावधान राखत वाचविले तरूणीचे प्राण

November 23, 2022

ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यत वेतनवाढ करण्याचे आश्वासन

August 10, 2023
Load more

HOT NEWS

इतर बातम्या

अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करा

राजकारण

काँग्रेसचे मधुकर नवले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

नवी मुंबई परिसर

वाशी, बेलापूर येथे सफाई कर्मचा-यांची वैद्यकीय तपासणी

नवी मुंबई परिसर

एपीएमसी मार्केट, रेल्वे स्थानकातही कोव्हीड टेस्टींग सुरु होणार

ABOUT US
Avirat Vaatchal is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
Contact us: aviratvaatchalnews@gmail.com
FOLLOW US
© Copyright 2016 - 2024 Avirat Vaatchal | All Rights Reserved | Design and Developed by Websteer Technologies
error: Content is protected !!
MORE STORIES

रविवारीदेखील नामनिर्देशन पत्रे स्वीकारणार

January 27, 2017

78 जागांसाठी 418 इच्छुक

May 11, 2017