मराठा आरक्षण : सर्वेक्षणाच्या कामासाठी नवी मुंबई महापालिकेचे 1100 हून अधिक कर्मचाऱ्यांची ड्युटी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 24 जानेवारी 2024

 महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत 23 जानेवारीपासून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यासाठी राज्यव्यापी विशेष मोहीम राबविण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली असून सर्वेक्षणाकरता 1100 हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

हे सर्वेक्षण कालबद्ध रीतीने अचूकरित्या पूर्ण करण्यासाठी पर्यवेक्षकांचे व प्रगणकांचे प्रशिक्षण घेण्यात आलेले असून या सर्वेक्षणाकरता शासनाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या विशेष ॲपवर गृहभेटी देऊन माहिती संकलित करण्यास सुरूवात झालेली आहे.

राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशानुसार सर्वेक्षणाचे काम 23 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत करण्यात येत असून या सर्वेक्षणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 1100 हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हे कर्मचारी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गृहभेटी देणार असून शासनाने दिलेल्या विहित नमुन्यात माहिती संकलित करणार आहेत. तरी नागरिकांनी आपल्या घरी माहिती संकलित करण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचूक माहिती द्यावी व संपूर्ण सहकार्य करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त नार्वेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

========================================================

========================================================

========================================================