उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, १२ ऑक्टोबर २०२२

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील श्री. खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्लीला द्वितीय आणि मुंबई उपनगरच्या अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळाला तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

याशिवाय 27 जिल्हास्तरीय विजेते घोषित करण्यात आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

गणेशोत्सव काळात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत जिल्हयातून एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तर समितीमार्फत प्रत्येकी एक याप्रमाणे प्राप्त झालेल्या एकूण 36 उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे 5 लाख, 2.5 लाख आणि 1 लाख रूपये आणि प्रमाणपत्र तसेच 33 जिल्हयातील अन्य प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसही 25 हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.