वाचन प्रेरणा दिनानिमित्त नवी मुंबईत वाचन संस्कृतीचा जागर

वाचनाचे महत्व अधोरेखित करणा-या घोषवाक्यांचे डिजीटल बोर्डवर प्रक्षेपण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 15 ऑक्टोबर 2022 :

भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम (Dr. A.P.J. Abdul kalam’s birthday celebrated as Reading day) यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ए पी जे अब्दुल कलाम यांची प्रेरणादायी पुस्तके प्रदर्शित करण्यात आली. त्याचप्रमाणे त्यामधील काही भागाचे वाचन करण्यात आले. ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील समृध्द ग्रंथालयातही डॉ ए पी जे अब्दुल कलाम तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ग्रंथसंपदेची आकर्षक मांडणी करून वाचन प्रेरणा दिनी अभिवादन करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात ए पी जे अब्दुल कलाम (Dr. A.P.J. Abdul kalam) यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपआयुक्त डॉ.श्रीराम पवार व अनंत जाधव यांच्यासह महापालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

वाचन प्रेरणा दिनानमित्त महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत वाचनाचे महत्व अधोरेखित करणारी घोषवाक्ये व संदेश असणा-या प्रतिमांचे मुख्यालयातील डिजीटल बोर्डवर तसेच विष्णुदास भावे नाट्यगृहातील डिजीटल बोर्डवर नागरिकांच्या माहितीसाठी प्रक्षेपण करण्यात आले व वाचन संस्कृतीचा जागर करण्यात आला.

——————————————————————————————————