146 ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे  2 एप्रिल 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 25-ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत, 146-ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या कामकाजासंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिव शाहू फुले आंबेडकर स्मृती सभागृह, बेथनी हॉस्पिटलच्या बाजूला पोखरण रोड नं. 2 येथे सकाळी 11.00 वा. मतदान कक्षामधील सर्व केंद्रस्तरीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची प्रथम प्रशिक्षणपूर्व मार्गदर्शनपर बैठक अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. आशिषकुमार बिरादार  यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

बातमी वाचा : राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे

या बैठकीमध्ये डॉ. बिराजदार यांनी 146-ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, शिपाई इत्यादी अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता प्रथम प्रशिक्षण शनिवार 6एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते सायं. 6 वा. पर्यंत डॉ. काशिनाथ घाणेकर नाटयगृह, खेवरा सर्कल, ठाणे येथे आयोजित करण्यात आले आहे असे सांगून यानुषंगाने मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना ईव्हीएम मशीन हाताळणी प्रशिक्षण देणे, प्रशिक्षण केंद्रावर करावयाची कार्यवाही, टपाली मतदानाबाबतची माहिती विहित नमुन्यांमध्ये भरुन घेणे, मतदान केंद्रावरील करावयाच्या कार्यवाहीबाबत माहिती दिली. 

बातमी वाचा : निवडणूक संदर्भातील विविध परवानग्यांसाठी ‘सुविधा पोर्टलचा’ वापर करा

तसेच टेबलनिहाय हजेरीपट तयार करणे, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची माहिती देणे, त्यांना माहिती पुस्तिका व निवडणूक संबंधी इतर नमुन्यांचे वाटप करणे इत्यादी निवडणूक संबंधी कार्यवाही करण्याबाबत मार्गदर्शन केले.

========================================================


========================================================

========================================================