नवी मुंबईत गेल्या वर्षभरात 6 हजार 366  श्वानदंश

प्रातिनिधिक फोटो

  • महापालिका श्वानदंश लस खरेदी करणार

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई, 19 ऑक्टोबर 2018:

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातमध्ये मागील वर्षभरात 6 हजार 366 जणांना श्वानदंश झाल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी दयानंद कटके यांनी शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली. महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक रूग्णालये, माता बाल रूग्णालय(बेलापूर) आणि सर्व नागरी आरोग्य केंद्रामध्ये श्वानदंशावरील लस उपलब्ध होण्यासाठी स्थायी समिती बैठकीत 1 कोटी 31  लाख 73 हजार 484 रूपयांच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

  • नवी मुंबई भागात श्वानदंशाचे प्रमाण मोठे आहे. त्यासाठी महापालिकेने हाफकिन इन्टिट्युटला श्वानदंशाबाबतची लस पुरवठा करण्याबाब पत्र पाठवले होते. मात्र संपूर्ण देशभरात या लसीच्या पुरवठ्याबाबत अडचण असल्यामुळे पुरवठा करणे शक्य नसल्याचे हाफकिनने महापालिकेला कळविले होते. त्यामुळे  ही लस पुरवठा करण्याबाबत महापालिकेने निविदा काढल्या होत्या. त्यामध्ये गगन फार्मा यांची निविदा पात्र ठरली. त्यांनी 262.42 प्रती लस या दराने ही लस महापालिका खरेदी करणार आहे. आरोग्य विभागाच्या अंदाजपत्रकात श्वानदंश लस खरेदी या शिर्षकाखाली १०० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित खर्च पुढच्या वर्षीच्या अंदाजपत्रकातील तरतुदींमधून भागविण्यात येणार आहे.

 

श्वानदंशाच्या लसीबाबत हाफकिन इन्टिट्युटकडे वारंवार पत्रव्यवहाराद्वारे मागणी करूनही ते देत नाहीत. त्यामुळे पुन्हा निविदा काढावी लागते. पुढची निविदा संपायच्या चार ते पाच महिने आधीच निविदा प्रक्रीया सुरू केली जाईल

रविंद्र पाटील, अतिरिक्त आयुक्त

===================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • एक धाव स्वच्छतेसाठी