कर्जत यार्ड सुधारणेसाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 8 डिसेंबर 2022

मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकावर 8 क्रमांकाचे पोर्टल उभारण्यासाठी विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक चालवणार आहे. त्यामुळे 11 डिसेंबर रोजी या मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करम्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

11 डिसेंबर रोजी सकाळी 10.45 ते दुपारी 12.00 वाजेपर्यंत नागनाथ ते कर्जत पर्यंत अप लाईनवर आणि ठाकूरवाडी ते कर्जत डाउन आणि मिडल लाईनवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे कर्जत ते खोपोली दरम्यान ब्लॉक कालावधीत कोणतीही उपनगरीय सेवा उपलब्ध असणार नाही.
तसेच  काही  एक्स्प्रेस गाड्या लोणावळा येथे नियमित केल्या जातील आणि आणि अंतिम स्थानकात वेळापत्रकापेक्षा उशिराने पोहोचतील

  • ट्रेन क्रमांक 22731 हैदराबाद-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस
  • ट्रेन क्रमांक 11014 कोईम्बतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस

तरी प्रवाशांनी हे बदल लक्षात घ्यावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

=============================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप