नमुंमपा स्तरावरील होम मिनिस्टर स्पर्धेतील पैठणी विजेत्यांचा आनंदोत्सव 

  • अविरत  वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 5 जानेवारी 2023

कोव्हीड प्रभावित 2 वर्षांच्या कालावधीनंतर अत्यंत उत्साहात साजरा झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त महिला अधिकारी, कर्मचारी यांचेकरिता ‘होम मिनिस्टर’ या विशेष स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 175 महिला अधिकारी, कर्मचारी यांनी सहभागी होत हा स्पर्धा उपक्रम यशस्वी केला. या अंतर्गत विविध खेळांमध्ये विजयी होत तसेच विचारलेल्या प्रश्नावलीला योग्य उत्तरे देत विजयी झालेल्या 5 भाग्यवान विजेतींना मानाची पैठणी देऊन सन्मानीत करण्यात आले.

या पैठणी विजेत्या सुनिता वीर – भोसले, मनिषा नारकर, चारुलता शिंदे, हेमलता म्हात्रे, प्रतिक्षा पाटील अशा टॉप 5 विजेत्यांनी बक्षीस स्वरुपात मिळालेली मानाची पैठणी परिधान करीत आज नमुंमपा मुख्यालयात एकत्र येत आनंदोत्सव साजरा केला.

=======================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र