बेलापूर न्यायालय देशातील पहिले डिजीटल न्यायालय-  न्या.गौतम पटेल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई,11 एप्रिल 2023

ई- फायलिंग आणि डिजीटल कोर्टाची संकल्पना तयार केल्यानंतर डिजीटल उपक्रमाला विरोध झाला मात्र बेलापूर न्यायालयाने त्यासाठी स्वत: पुढाकार घेऊन आपल्या न्यायालयातील कारभार पेपरलेस व डिजीटल केल्यामुळे बेलापूर न्यायालय महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील पहिले डिजीटल कोर्ट ठरले असल्याचे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती गौतम पटेल यांनी केले. बेलापूर न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती गौरी गोडसे यांच्या उपस्थितीत आणि ठाणे जिह्याचे सत्र न्यायाधीश अभय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उदघाटन वरिष्ठ विधीज्ञ पी.सी.पाटील यांच्या हस्ते, तर दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उदघाटन सहाय्यक अधीक्षक बी. टी. शेलार यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे पदाधिकारी, ठाणे जिह्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर, नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मोकल आदी मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई शहराचा झपाट्याने विकास होत आहे. येथील न्यायालयीन खटल्यांमध्ये देखील वाढ होत आहेत. त्यामुळे या न्यायलयातून चांगल्या वातावरणात पार्देशकतेने जास्तीत जास्त खटले निकाली काढले जातील असे न्या.गौरी गोडसे यांनी सांगितले. यावेळी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधिश अभय मंत्री यांनी ई फाईलीग, डिजीटल कोर्ट, ई कोर्ट झाल्यास न्यायालयीन कामकाजात पारदर्शकता वाढेल, न्यायाधीशांची कार्यक्षमाता वाढेल, त्यात अधिक सुधार होईल, पक्षकारांना याचा फायदा होईल, कोणतीही माहिती कुठेही उपलब्ध होईल, त्यामुळे ख-या अर्थाने न्यायालय तुमच्या दारी येईल असे स्पष्ट केले.

Swapna’s Foodtrack Youtube Channel

  • डिजीटल कोर्टाचे कामकाज कसे चालणार

 

बेलापूर कोर्टात दावा दाखल करण्यासाठी आता प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज लागणार नाही. त्यासाठी पक्षकाराला आपल्या वकिलामार्फत उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर ई फायलिंग सेक्शमध्ये जावे लागणार आहे. तिथे जिल्हा निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. जिल्हा निवडल्यानंतर आपला दावा

दाखल करण्यासाठी पर्याय देण्यात आला आहे त्यानुसार दावा अपलोड करावा लागणार आहे. हा दावा अपलोड केल्यानंतर त्यांना कागदपत्र सोबत नेण्याची गरज लागणार नाही. तिथे यूनिक आयडी दिला जाईल. याच्या माध्यमातून तुम्हाला आपल्या केसशी संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. तसेच न्यायालयाच्या प्रोसिडिंगबाबतची माहितीही ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. यामध्ये याचिकाकर्त्यांना जर आपल्या केसशी संबंधित कागदपत्रे हवी असतील तर ते घेवू शकतात. मात्र सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध असणार आहे. बेलापूर न्यायालयात मागील एका महिन्यात साधारण ४०० दावे ऑनलाईन पध्दतीने दाखल झाल्याची माहिती नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनिल मोकल यांनी दिली.

========================================================

अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

अविरत वाटचाल वर्तमानपत्र