इमारत व बांधकाम लाभार्थी कामगारांसाठी नियमांत सुधारणा करणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 19 ऑक्टोबर 2023

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेमध्ये सुधारणा करून त्यांचा लाभ गतीने मिळण्यासाठी कामगार नियमांत सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या मंडळामार्फत लाभार्थीकरिता विविध कल्याणकारी योजना आहेत.  मात्रत्यांच्या अटीशर्तीनिकष आणि आर्थिक बाबी निश्चित करण्यात न आल्यामुळे त्यांची अंमलबजावणी करताना अडचणी येत होत्या.  या अडचणी दूर करण्यासाठी सुधारणा आवश्यक होत्या. 

ही बातमी वाचा : महाप्रित उभारणार ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्पाद्वारे परवडणारी घरे

केंद्र शासन व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ एखाद्या लाभार्थीने घेतला असल्यास त्यास परत त्याच योजनेचा लाभ मिळू नये यासाठी आता मंडळामार्फत सदर लाभार्थी कामगार अपात्र ठरविण्यात येईल अशी सुधारणा देखील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार विनियमन व सेवाशर्ती) नियम२००७ मधील नियम ४५ मध्ये करण्यात येईल.

========================================================