वाशी खाडीपूलावरील पहिला पूल मे 2024 ला सुरू होणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 24 ऑगस्ट 2023

वाशी खाडीपूलावरच्या दोन पुलांचे काम सुरू असून पहिला पूल मे 2024 साली आणि दुसरा पूल सप्टेंबर 2024 साली वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी आज नवी मुंबईत दिली.

दादा भुसे यांनी आज वाशी खाडी पूल प्रकल्पाच्या ठिकाणी भेट दिली आणि ठाणे क्रीक पुलाच्या कामाची पाहणी करत आढावा घेतला. यावेळी एमएसआरडीए सह व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्या सह विविध अधिकारी उपस्थित होते.
वाशी पूलावर आता असलेल्या सहा मार्गिकांचा रस्ता हे दोन्ही पूल पूर्ण झाल्यावरती बारा मार्गिकांचा होईल, या माध्यमातून वाहतूक कोंडी सोडवण्यात मोठी मदत होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ठाणे खाडीवर नवी मुंबईच्या दिशेने पहिला पूल 1971 साली तर दुसरा पूल 1995 साली बांधण्यात आला.

===================================================