गव्हाण ग्रामपंचायतीवर आघाडीचे वर्चस्व

सरपंचपदी जिज्ञासा कोळी यांचा विजय

पनवेल, 12 एप्रिल 2017/AV News Bureau:

गव्हाण ग्रामपंचायतीच्या अटीतटीच्या निवडणुकीत शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने भाजपला धक्का देत सरंपंचपद आपल्याकडे खेचले आहे. आघाडीच्या उमेदवार जिज्ञासा कोळी यांनी भाजपच्या उमेदवार स्नेहलता ठाकूर यांचा अतिशय चुरशीच्या लढततीत पराभव करीत सरपंचपद पटकवले आहे.

भाजप नेते रामशेठ ठाकूर यांच्या भगिनी रत्नप्रभा घरत या पंचायत समिती सदस्य झाल्यामुळे सरपंचपद रिक्त झाले होते. उपसरपंच सचिन घरत हे प्रभारी सरपंच म्हणून काम पाहत होते. त्यामुळे सरपंचपदासाठी आज निवडणूक झाली. शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीतर्फे शेकापच्या जिज्ञासा किशोर कोळी या निडवणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. तर भाजपतर्फे स्नेहलता ठाकूर निवडणुकीला सामोरे गेल्या. अतिशय चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत जिज्ञासा कोळी यांनी सहा मते मिळवली तर भाजपच्या उमेदवाराला पाच मते मिळाली.

दरम्यान, पनवेल महापालिका निवडणूक काही दिवसांवर आलेली असताना गव्हाण ग्रामपंचायतीत मिळालेल्या यशामुळे आघाडीचा उत्साह दुणावला आहे. तर भाजपला, खासकरून रामशेठ ठाकूर यांना हा पराभव धक्कादायक असल्याचे बोलले जात आहे.