कोकण विभागात 54 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र कार्यान्वीत

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19  ऑक्टोबर 2023

“प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या” लोकार्पण प्रसंगी कोंकण विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी पनवेल केंद्रावर उपस्थित राहून  दृक श्राव्य प्रणालीव्दारे  या कार्यक्रमात सहभाग घेतला.  तरुणांच्या रोजगार संधीसाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देणाऱ्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दृक श्राव्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ झाला.

राज्यातील 511 ग्रामपंचायतीमधील ही केंद्रे एकाच वेळी सुरू करण्यात आली असून, त्यापैकी कोकण विभागात 54 केंद्र आज सुरू करण्यात आली. यावेळी सह्याद्री अतिथीगृह येथून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव मनोज सौनिक हे दृक श्राव्य प्रणाली माध्यमाद्वारे उपस्थित होते.

पनवेल केंद्र येथून आमदार प्रशांत ठाकूर, उप आयुक्त (विकास) गिरीश भालेराव, उप आयुक्त कौशल्य  विकास डी.डी.पवार, उप आयुक्त पनवेल महानगरपालिका कैलाश गावडे, प्रगती स्किल डेव्हलपमेंटचे संचालक  चव्हाण तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ही बातमी वाचा : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारांच्या काय असतात पात्रता व अपात्रता जाणून घ्या !

महाराष्ट्रातील 28 हजार ग्रामपंचायतींमध्ये आजवर एकही कौशल्य विकास केंद्र नव्हते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार ही कौशल्य विकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला.  रोजगारासाठी तरुणांचे गावातून शहरात स्थलांतर होऊ नये या दृष्टीने कौशल्य विकास केंद्राची ही संकल्पना महत्त्वाची असून, भविष्यात राज्यातील या केंद्रांची संख्याही वाढवण्यात येणार आहे.  ही केंद्र 34 जिल्ह्यांच्या ग्रामीण भागांमध्ये स्थापन करण्यात आली आहेत.  कोकण विभागातील ठाणे जिल्ह्यात 9, पालघर जिल्ह्यात 12, रायगड जिल्ह्यात 14, रत्नागिरी जिल्ह्यात 11, तर सिंधुदूर्ग जिल्ह्यात 8 अशा एकूण 54 कौशल्य विकास केंद्रांचे एकाच वेळी दृक श्राव्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले.

कोकण विभागात विविध ठिकाणी “प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या” लोकार्पणाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणात आला. ठाणे येथे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्य उपस्थितीत कोन ग्रामपंचायत येथे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाधिकारी ठाणे अशोक शिनगारे उपस्थित होते.  रायगड जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांनी चेंढरे ग्रामपंचायत केंद्र येथून कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी त्या ठिकाणी 1500 युवक, युवती, विद्यार्थी उपस्थित होते. पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके हे उमरोळी येथील ग्रामपंचायत येथून कार्यक्रमासाठी उपस्थित होते.  पालघर जिल्ह्यात 12 ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला. रत्नागिरी जिल्हयात जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 11 ठिकाणी कौशल्य विकास केंद्राच्या  लोकापर्ण  कार्यक्रम संपन्न झाला.

========================================================