ठाणे शहरातील बसस्थानकावरील प्रवाशांमध्ये मतदानाबाबत जनजागृती

मतदान जनजागृती कार्यक्रमात प्रवाशांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद

  •  अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 25 एप्रिल 2024

लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी आपली सर्व कामे बाजूला ठेवून उज्वल भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता ० मे २०२४ रोजी अवश्य मतदान करावे असे आवाहन ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील बसस्थानकावर करण्यात आले.

News Update : आचारसंहिता नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याकडे काटेकोर लक्ष द्या

२५ ठाणे-लोकसभा मतदार संघ अंतर्गत, १४८ ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूक विषयक मतदार जनजागृती व्हावी व मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील बसस्थानकावर मतदान जनजागृती कार्यक्रम बुधवारी (25 एप्रिल) घेण्यात आला.

News Update : तीव्र उन्हाळ्याचा सामना करण्यासाठी ठाणे महापालिकेची उपाययोजना

या जनजागृती मोहिमेत बसस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या ठिकाणी 25 ठाणे लोकसभा मतदार संघाचे मतदान जनजागृतीबाबत लावण्यात आलेले मोठे फलक हे प्रवाशांचे लक्ष वेधून घेत होते. यावेळी स्वीपच्या पथकाने बसस्थानकावरील प्रवाशांना मतदानाचे महत्व पटवून दिले.

विशेष लेख : निसर्ग समजून घ्यावाच लागेल

या कार्यक्रमात ठाणे परिवहन बसस्थानक येथील सर्व अधिकारी, कर्मचारी व प्रवासी सहभागी झाले होते. यावेळी ‘मतदान जनजागृती’ विषयक माझं मत माझा अधिकार, मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो आणि जागरूक मतदार लोकशाहीचा आधार या घोषणा सर्व प्रवाशांनी मोठ्या आवाजात सामूहिकपणे दिल्या. तसेच मतदान जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेला माहितीपट व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी मतदारांना केलेले आवाहन तसेच मतदानासंदर्भात इतर जनजागृती कार्यक्रम चित्रफितीच्या माध्यमातून दाखविण्यात आले.

Lead Story : किनारपट्टी सुरक्षेसाठी सागर रक्षक एप (App)

सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ,अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आसावरी संसारे यांच्या प्रेरणेने आणि स्वीप पथक प्रमुख सोपान भाईक यांच्या नेतृत्वाखाली सदर मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

========================================================

========================================================

========================================================