विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त ९६ वर्षीय ज्येष्ठ माजी सदस्यॲड. गोविंदराव आठवले यांचा सत्कार

उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांचे सुचने नुसार नागपूर येथे सत्कार 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नागपूर, 22 डिसेंबर 2023

महाराष्ट्र विधानपरिषदेचे ९६ वर्षीय सर्वात ज्येष्ठ माजी सदस्य ॲड. गोविंदराव आठवले यांचा  २० डिसेंबर रोजी उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांचे पुढाकाराने हृद्य सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र विधानपरिषदेला १०० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांचे पुढाकाराने ८ नोव्हेंबर, २०२३ आणि ८ डिसेंबर, २०२३ रोजी अनुक्रमे मुंबई आणि नागपूर येथे समारंभ झाला. या समारंभामध्ये अनेक ज्येष्ठ माजी विधान परीषद सदस्य व ज्येष्ठ पत्रकार त्याला सत्कार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच विधान सभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर यांचे उपस्थितीत मुंबई व नागपूर येथे कार्यक्रम घेतला होता. या कार्यक्रमाला
वयोमानामुळे ॲड. गोविंदराव आठवले, माजी विधानपरिषद सदस्य उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचे वय ९६ वर्ष आहे, त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात यावा यासाठी विधानपरिषदेच्या माननीय उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या सूचनेनुसार त्यांचे खाजगी सचिव  रविंद्र खेबुडकर, विधान मंडळाचे जनसंपर्क अधिकारी  निलेश मदाने, उप सभापतींचे विशेष कार्य अधिकारी डॉ संतोष उडतेवार यांनी ॲड. गोविंदराव आठवले यांच्या निवासस्थानी भेट दिली.

या भेटीत ॲड आठवले यांचा शाल, विधिमंडळाचे गौरवचिन्ह, विधानमंडळातर्फे प्रकाशित राजर्षी छत्रपती शाहू महाराज ग्रंथाची प्रत आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या हृद्द कार्यक्रमावेळी त्यांचे पुतणे अतुल आठवले आणि परिवारजन तसेच ते विधानपरिषदेचे सन्माननीय सदस्य असतांना त्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून जबाबदारी पार पाडणारे ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक उपस्थित होते.

सन १९७२ ते १९७८ याकाळात ॲड. गोविंदराव आठवले यांनी विदर्भ पदवीधर मतदारसंघाचे विधानपरिषदेत प्रतिनिधित्व केले. वयाच्या ९६ व्या वर्षी देखील ज्येष्ठ माजी सदस्य ॲड. गोविंदराव आठवले यांची स्मरणशक्ती आणि वाणी तीक्ष्ण असून त्यांनी या सत्कारप्रसंगी १९७२ ते १९७८ या काळातील विधानपरिषदेतील अनेक महत्वाचे प्रसंग, आठवणींना उजाळा देत सत्काराबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच डॉ नीलम गोऱ्हे यांच्या बद्दल व त्यांचे कामाबद्दल कृज्ञतापूर्वक उलेख्ख केला. तसेच महिलांच्या सक्षमीकरण करण्याच्या कार्यक्रमाची त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आणि डॉ गोऱ्हे यांचे माणुसकीबद्दल धन्यवादाची भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी दत्तोपंत ठेंगडी यांचे चरित्र कृतज्ञतापूर्वक उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांना सस्नेह भेट दिले.

========================================================

 

========================================================