माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अतुल शहा यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिक कार्डाचे वितरण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 25 डिसेंबर 2023

माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या जन्मजयंती दिनी वंदन करण्यासाठी कस्तुरबा गांधी चौक, सी पी टँक , येथे मा.आमदार अतुल शाह ह्यांनी स्व. अटलबिहारी वाजपेयी ह्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरीक कार्डांचे वितरण करण्यात आले.

वॉर्ड २२० चे समन्वयक मनीष चौरसिया ह्यांनी अतुल शाह ह्यांच्या मार्गदर्शनाखाली जेष्ठ नागरिकांचे कार्ड जिल्हा कार्यालयातून बनवून घेतले त्या ज्येष्ठ नागरिकांना अतुल शाह व द.मुंबई भाजपा महामंत्री धनेश कानेटकर तसेच विक्रम ब्रह्मभट्ट आणि रमेश मेहता ,जयेश शाह, केतन बधेका, प्रेम शर्मा,बळवंत गायकवाड, अनिल चौरसिया , सूर्यकांत कायस्थ,  राजुल बेन कायस्थ,मीणाबेन लेहरु, दिपिकाबेन दर्जी,  मनोज वाडकुल, पवन शर्मा, वेद सिंग,मोहन चौरसिया,अनिल कांबळे व इतर मान्यवरांच्या हस्ते जेष्ठ नागरिक कार्डचे वितरण करण्यात आले.

========================================================


========================================================