उलवे येथे प्रितम म्हात्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा

सचिन राजे येरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिर,वाचनालय, बस स्टॉप शेड, शौचालय उभारणीच्या कामाला  प्रारंभ

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • उलवे, १५ जानेवारी २०२४

पनवेल महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त उलवे नोडमधील सामाजिक कार्यकर्ते सचिन राजे येरुणकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. यावेळी उलवे पंचक्रोशीतील अनेक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी प्रितम म्हात्रे यांचा वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ देवून तसेच ओवाळणी करून स्वागत करण्यात आले.

प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांचे डोळे तसे इतर आरोग्य तपासण्या मोफत करण्यात आल्या.

तसेच कोपर तलाव सेक्टर 8 उलवे नोडमध्ये स्थानिक नागरिकांच्या मागणीचा विचार करून ओपन जिमचे भूमीपुजन करण्यात आले. तसेच सार्वजनिक शौचालयाचे कामही सुरु करण्यात आले. यावेळी उलवे सेक्टर १५ मध्ये ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी वाचनालय आणि खारकोपर रेल्वेस्टेनच्या समोर बस स्टॉप शेड उभारण्यात आली आहे.

प्रतिम म्हात्रे यांच्या उपस्थितीत परिसरातील वृद्धाश्रमात वास्तव्याला असणाऱ्या महिलांना कपडे तसेच फळ वाटप करण्यात आले.

वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सामाजिक उपक्रमांना आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि महिला मंडळ, आम्ही कोकणकर संगठना, सेक्टर 8/9/10 रहिवाशी संगठना आणि महिला मंडळ, कछ वागड पाटीदार लेवा गुजराती समाज आणि शेतकरी कामगार पक्ष उलवे नोड मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. याशिवाय गव्हाणच्या सरपंच माई भोईर, पनवेल तालुका भात गिरणी संघाचे राजेंद्र घरत, माजी सरपंच सचिन घरत, सुहास देशमुख,  मिलिंद डोके, राकेश घरत, महेश घरत, रमेश ठाकूर,  प्रलाद भगत, निलेश पाटील, संदीप पाटील, प्रदीप नलावडे, प्रदीप पांचाळ, राकेश बादावटे, अमित दवंडे, मुकेश मोरे,  रचना येरुणकर, श्रावणी पांचाळ, सरिता साळवे,सिद्धी पैकडे, स्वप्ना आरोदेकर, सपना ढोके, निशिगंधा शेलार,सवित्ता दवे, सोनल ठाकूर, कीर्ती फाटका, रोहिणी भोसले, पूर्णिमा जोशी,  प्रिया जगदीश आदी मोठय़ा संख्येने महिला आणि नागरिक उपस्थित होते.

========================================================

 

========================================================

========================================================