पायाभूत सुविधा निर्माण करण्यामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन
  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे , 3   मार्च 2024

नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देन्यामध्ये देशात महाराष्ट्र राज्य अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदूष्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते.

यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून ) मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे,आ. रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते


गेल्या काही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विकास कामे शासन करत आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्याने अनेक उपक्रम राबविले जात आहेत यामध्ये स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच विविध लोकउपयोगी उपक्रमाचा समावेश आहे.
अंबरनाथ मध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून त्या ठिकाणी अधिष्ठता देखील नियुक्त करण्यात आला आहे.कळव्यातील रुग्णालयामधील कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी विभाग कॅशलेस करण्यात आलेला आहे. रेडिओलॉजी च्या माध्यमातून जे उपचार होणार आहेत ते माफक दरामध्ये देण्यात येणार असून या भागातील खासदार हे स्वतः डॉक्टर असल्यामुळे या भागातील सुविधा निर्माण करण्यासाठी ते शासनाकडे सतत पाठपुरावा करत असतात त्याबद्दल खासदार श्रीकांत शिंदे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले.

महात्मा फुले जन आरोग्य अभियाना अंतर्गत यापूर्वी दीड लाखापर्यंत उपचाराची मर्यादा होती या मर्यादेत वाढ करून आता पाच लाखापर्यंत उपचार घेता येणार आहेत राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित या अंतर्गत चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या आरोग्य योजना देखील राज्यांमध्ये राबविण्यात येत आहेत असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले
मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते दूरदृष्टी प्रणाली द्वारे पुढील विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला डोंबिवली पश्चिम येथील मासळी बाजार, डोंबिवली पूर्व येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथील शवविच्छेदनगृह, नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU ), सुनील नगर येथील अभ्यासिका या विकास कामाचा समावेश आहे.

========================================================


========================================================