ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 43 उमेदवारांचे अर्ज दाखल

शेवटच्या दिवशी एकूण 26 नामनिर्देशन पत्रे दाखल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 3 मे 2024

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी  येत्या 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. या मतदान प्रक्रियेसाठी नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा आज अखेरच्या दिवशी 23 उमेदवारांनी 26 नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले असून आजपर्यंत एकूण 43 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये धुळे यांनी दिली आहे.

LEAD STORY : ठाणे वर्चस्वाची लढाई

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना पक्षाचे उमेदवार नरेश गणपत म्हस्के, संयुक्त भारत पक्षाचे उमेदवार संभाजी जगन्नाथ जाधव, भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे उमेदवार आतिकुर रेहमान शेख, बहुजन समाज पार्टीचे उमेदवार संतोष भिकाजी भालेराव, भीमसेन पक्षाचे उमेदवार मुकेश कैलासनाथ तिवारी, बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार सलीमा मुक्तार वसानी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन बाबुराव विचारे, राष्ट्रीय मराठा पार्टीचे सुनील शिवाजी राठोड, हिंदुस्थान मानव पक्षाचे उमेदवार रामेश्वर सुरेश भारद्वाज, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. रामराव तुकाराम केंद्रे यांनी अर्ज भरले आहेत. तसेच अपक्ष उमेदवार म्हणून गुरूदेव नरसिंह सूर्यवंशी, प्रमोद आनंदराव धुमाळ, सिध्दान्त छगन शिरसाट, अजय तुळशीराम मगरे, संजय मनोहर मोरे, अब्दुल रेहमान शेख, दत्तात्रय सीताराम सावळे, जयदीप विजयकुमार कोर्डे, संतोष रघुनाथ कांबळे, प्रशांत रघुवीर अहिवार, जुबिन रझाक पटवे, इरफान इब्राहिम शेख, मोहम्मद इक्बाल मोहम्मदअली बाशे या 23 उमेदवारांनी एकूण 26 नामनिर्देशन पत्रे आज 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये धुळे यांच्याकडे सादर केले.

LEAD STORY : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष

3 मे दुपारी 3 वाजेपर्यंत एकूण 5 नामनिर्देशनपत्रांचे वाटप करण्यात आले. यात आरपीआय -1, अपक्ष -2, राष्ट्रीय मराठा पार्टी -1, बहुजन मराठा पार्टी -1 यांचा समावेश आहे.

नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यास सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण 42 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात विविध पक्षांच्या 25 तर 17 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.

LEAD STORY : किनारपट्टी सुरक्षेसाठी सागर रक्षक एप (App)

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी यापूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार राजन बाबुराव विचारे, सरदार वल्लभभाई पटेल पार्टीचे उमेदवार सुभाषचंद्र झा, भारतीय राजनीतीक विकल्प पक्षाचे उमेदवार सुरेंद्रकुमार के जैन,  आझाद समाज पार्टीच्या उमेदवार अर्चना दिनकर गायकवाड, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार राहूल जगदीशसिंघ मेहरोलिया, बहुजन मुक्ती पार्टीचे उमेदवार चंद्रकांत विठ्ठल सोनावणे,  तर, भारतीय जवान किसान पार्टीचे उमेदवार राजेंद्र रामचंद्र संखे, रिपब्लिकन बहुजन सेनेचे विजय ज्ञानोबा घाटे, पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचे उमेदवार उत्तम किसनराव तिरपुडे, हिंदु समाज पार्टीचे उमेदवार भंवरलाल खेतपाल मेहता तर अपक्ष म्हणून मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारी, डॉ पियूष के. सक्सेना, राजीव कोंडिबा भोसले, खाजासाब रसुलसाब मुल्ला या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

नामनिर्देशन पत्रांची छाननी  ४ मे २०२४ रोजी करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक ६ मे २०२४ असल्याचे  निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये धुळे यांनी सांगितले आहे.

नामनिर्देशपत्रे दाखल करण्याच्या दिनांकापासून म्हणजे २६ एप्रिल २०२४ पासून ते ३ मे २०२४ पर्यत एकूण १०५ नामनिर्देशनपत्रांचे वाटप करण्यात आले असल्याची माहितीही जायभाये यांनी दिली आहे.

नामनिर्देशनपत्रे वाटप केलेल्या पक्षांची नावे

भारतीय राजनीती विकास पार्टी – 1

आम आदमी पाटी – 1

अपक्ष –  46

भूमीपुत्र पार्टी – 1

बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी – 2

बहुजन शक्ती – 1

संयुक्त भारत पक्ष – 2

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष  – 4

हिंदुस्थान मानव पक्ष – 1

रिपब्लिकन बहुजन सेना – 2

पिपल्स पार्टी  ऑफ इंडिया डेमोक्रेटिक – 3

सरदार वल्लभभाई पटेल पार्टी – 2

बहुजन मुक्ती पार्टी – 2

भारतीय जवान किसन पार्टी – 2

दिल्ली जनता पार्टी – 3

लोकराज्य पक्ष – 1

हिंदू समाज पार्टी – 3

धर्मवीर आनंद दिघे साहेब विचार आणि सेवा मंच – 1

बहुजन समाज पार्टी – 6

भारतीय राष्ट्रवादी पार्टी – 1

वंचित बहुजन आघाडी – 5

आझाद समाज पार्टी –  1

भारतीय जनता पार्टी –  1

रिपब्लिकन सेना – 1

शिवसेना शिंदे गट – 4

भारत महापरिवार पार्टी – 1

भिमसेना – 1

निर्दलीय पक्ष – 1

आरपीआय – 1

बहुजन महापार्टी – 3

राष्ट्रीय मराठा पार्टी – 1

========================================================


========================================================