नवी मुंबई सायबर पोलिसांची कामगिरी
- अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
- नवी मुंबई, 11 जून 2025
“IPO and Index Trading मधील गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा मिळवुन देण्याचे आमिष दाखवुन ४.५ कोटी रक्कमेची, सायबर फसवणुक केल्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने दोन आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 नोव्हेंबर 2024 पासून 5 मार्च 2025 पर्यंतच्या कालावधीत आरोपींनी IPO and Index Trading मधील गुंतवणुकीमध्ये जास्त फायदा मिळवुन देण्याचे आमिष दाखवून फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वेगवेगळया बँक खात्यावर, गुंतवणुकीकरिता रक्कम पाठवण्यास सांगुन एकुण ४,७१,६५,०००/- रुपयांची आर्थिक फसवणुक केली. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादी यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे सायबर पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर १०/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३१९ (२), ३१८(४), ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (डी) अन्वये अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोलीस उपनिरीक्षक रोहित बंडगर यांचे पथकाने तांत्रिक तपास करून, गुन्हयांतील आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेले बैंक खाते व इतर तांत्रिक विश्लेषण माहितीच्या आधारे आरोपी नामे विकास प्रकाश गव्हाणे, वय २७ वर्षे, व्यवसाय-इस्टेट एजेन्ट, रा. करंजाडे यास ताब्यात घेतले. त्यांचेकडे तपास करुन त्याचा साथीदार आरोपी मनोज विष्णु कालापाड, वय २२ वर्षे, शिक्षण-बी.ए, राहणार- मालेगाव, जि. वाशिम यास येथुन ताब्यात घेतले.
याआरोपींना ७ जून रोजी अटक केली असून 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.या प्रकरणी अधिक तपास सुरु असून अटकेतील आरोपींचा महाराष्ट्र तसेच इतर राज्यातील १० सायबर फसवणुकीचे तकारी मध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरचा आव्हानात्मक सायबर गुन्हा पोलीस आयुक्आत मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्मित संजय येनपुरे, अप्पर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, आ.गु. शा/सायबर, भाऊसाहेब ढोले यांचे मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कदम, पोउपनिरी रोहित बंडगर, पोहवा विजय आयरे, पोहवा / संदेश, गुजर, पोशि/भाऊसाहेब फटांगरे, पोशि/ नितेश म्हात्रे, मपोशि / पुनम गडगे नवी मुंबई यांनी उघडकीस आणला आहे.
=======================================================