पाऊसपाणी

( फोटो – कार्तिकी ठाकुरदास)

बुधवारीही मुसळधार पावसाची शक्यता, शक्यतो घरातच थांबा (heavy rain in mumbai)

मुंबई, 29 ऑगस्ट 2017/AV News Bureau: (heavy rain in mumbai)

गेल्या दोन दिवसांपासून कोसळणा-या पावसाने आज मात्र रौद्ररूप धारण केलं. सोमवार रात्रीपासून सतत कोसळणा-या पावसाने आज क्षणाचीही विश्रांती घेतली नाही. 26 जुलै 2005 नंतर प्रथमच पावसाने इतका धुमाकूळ घातला आहे. सुस्साट वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळू लागल्यामुळे घराबाहेर पडलेल्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले. दिवसभर पाऊस कोसळत असल्यामुळे मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली रेल्वे सेवा ठप्प पडली. मध्य रेल्वेच्या मेन, हार्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. तर पश्चिम रेल्वेच्या गाड्याही उशिराने धावत होत्या. त्यामुळे कामधंद्यानिमित्त घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे चांगलेच हाल झाले. बुधवारीदेखील मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी महत्वाचे काम असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन शासनाच्यावतीने करण्यात आले आहे.  (heavy rain in mumbai)

 

——-

 

—-

सतत कोसळणाऱ्या पावसामुळे आसनगाव-वाशिंद दरम्यान रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे दुरांतो एक्सप्रेसचे इंजिनासह 9 डबे रुळावरून घसरले. या अपघातात काही प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने जिवितहानी झालेली नाही. या अपघातामुळे तसेच मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवाही विस्कळीत झाली असून लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला  आहे. . अपघातग्रस्त एक्सप्रेसचे डबे हलविण्याचे आणि रेल्वे मार्ग दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेतर्फे देण्यात आली.

पावसामुळे  मुंबईसह आजुबाजूच्या परिसरातील वीज पुरवठ्यावर विपरित परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे महावितरणच्या अनेक सबस्टेशनमध्ये पाणी घुसल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला.heavy rain in mumbai

कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक आणि राज्याच्या इतर भागातही मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक भागांत पावसाचा जोर कायम असून उद्याही चांगलाच पाऊस पडेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे.(heavy rain in mumbai)

मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे ठाणे शहरातील सखळ भागात पाणी साठले आहे. आत्पकालीन परिस्थितीत नागरिकांनी 1800 222 108, दूरध्वनी क्रमांक 25371010, 25399828, 25374578 ते 82, 25399617 आणि 25392323 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, पुढील 24 तासांमध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अतिशय महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच समुद्रालाही उधाण येण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी समुद्र किनाऱ्यांजवळ जावू नये तसेच मच्छिमारांनीही समुद्रात होड्या उतरवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.