विनाअनुदानीत गॅस सिलिंडर 86 रुपयांनी महागला

अनुदानीत गॅस सिलिंडर ग्राहकांना जूनाच दर

नवी दिल्ली, 2 मार्च 2017:

1 मार्च 2017 पासून स्वयंपाकाच्या विनाअनुदानित गॅस सिलेंडरच्या किंमतीत 86 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना सिलिंडरसाठी 737 रुपये मोजावे लागणार आहे. मात्र याचा अनुदानीत गॅस सिलिंडर ग्राहकांवर याचा परिणाम होणार नसल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

एलपीजी उत्पादनांच्या जागतिक किंमतीतल्या वाढीमुळे गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये वाढ करण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. मात्र या वाढीव दराचा अनुदानित दराने गॅस सिलेंडरचा रिफील करणाऱ्या ग्राहकांवर याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सरकारने स्पष्ट केले.  उदाहरणार्थ, नवी दिल्लीत नव्या एलपीजी रिफीलसाठी ग्राहकांना 737 रुपये द्यावे लागतील आणि त्यांच्या खात्यात 303 रुपयांचे अनुदान जमा होईल. म्हणजेच ग्राहकांना पूर्वी प्रमाणे एकूण 434 रुपये द्यावे लागतील, ज्यात कोणताही बदल होणार नाही.