कोपरखैरणे येथे प्लॅटचा स्लॅब आणि पीओपी पडून 2 जखमी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 24 ऑक्टोबर 2026

कोपरखैरणे सेक्टर 1 प्लॉट नंबर 45 गंगासागर सोसायटी प्लॅट क्रमाक 101 च्या बेडरुमधील स्लॅब व पीओपी आज दुपारी १२.२६ मिनिटांनी  कोसळले. या दुर्घटनेत फ्लॅटमध्ये  हणारे  राकेश गुप्ता व खुशबू गुप्ता यांच्या अंगावर स्लॅब व पीओपी पडल्यामुळे त्यांना दुखापत झाली.  या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी दोघांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, स्लॅब पडलेल्या फ्लॅटमधील रहिवाशांना आम्ही सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. सदर घटनास्थळी कोपरखैरणे अग्निशमन दल,कोपरखैरणे वॉर्ड चे कर्मचारी सचिन आरकडे व समाधान चाळके हे घटनास्थळी उपस्थित होते. कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे अधिकारी ए पी आय बनकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.