• Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Search
27.7 C
Navi Mumbai
Wednesday, October 21, 2026
Marathi News
  • Homepage
  • लीड स्टोरी
  • ठळक बातम्या
    • इतर बातम्या
    • मुंबई आणि उपनगर
    • ठाणे परिसर
    • नवी मुंबई परिसर
    • पनवेल- रायगड-उरण
  • राजकारण
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • आरोग्य
  • फोटो
  • मनोरंजन
  • अर्थ/ बाजारहाट
  • विविधा
    • मागोवा
    • कामगार विश्व
    • ज्येष्ठ पर्व
    • महिला
    • E-paper
  • E-Paper
Home ठळक बातम्या विद्यार्थ्यांच्या खात्यात दीड कोटी जमा
  • ठळक बातम्या
  • युवा

विद्यार्थ्यांच्या खात्यात दीड कोटी जमा

By
Siddharth Haralkar
-
June 19, 2017
Share on Facebook
Tweet on Twitter

नवी मुंबई महापालिकेच्या 20 शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे पैसे

स्वप्ना हरळकर/ AVIRAT VAATCHAL NEWS

नवी मुंबई, 19 जून 2017/AV News Bureau:

नवी मुंबई महापालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्य खरेदीपोटी शिक्षण विभागाने मागील शैक्षणिक वर्षासाठीचे सुमारे दीड कोटी रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत. 20 शाळांमधील सुमारे 6 हजार 545 विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात तब्बल 1 कोटी 41 लाख 82 हजार 430 रुपये जमा करण्यात आले असून उर्वरित विद्यार्थ्यांची रक्कमही त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.

महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याऐवजी त्यासाठी लागणारी रोख रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. महापालिकेच्या या निर्णयाला अनेक लोकप्रतिनिधींनी विरोध केला असला तरी या निर्णयाची यापुढेही अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यापार्श्वभूमीवर 6 डिसेंबर 2016 च्या शासनाच्या आदेशानुसार महापालिका शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांनी शालेय वस्तूंची खरेदी करावी आणि त्यांची देयके पालिकेकडे द्यावीत असे कळविण्यात आले होते. नवी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने 30 मार्च 2017 रोजी या आदेशाला मंजुरी दिली. महापालिका शाळांमधील मुख्याध्यापकांनाही याबाबतची कल्पना देण्यात आली. त्यानंतर विद्यालय विकास समितीच्या माध्यमातून पालकांच्या सभा घेऊन जवळपास 21 हजार विद्यार्थ्यांनी बँकेत खाती उघडली आहेत. त्यामुळे महापालिकेच्या 53 पैकी 20 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्त आल्याची माहिती शिक्षणाधिकारी संदीप संगवे यांनी दिली.

दरम्यान, अद्याप 33 शाळांमधील विद्यार्थ्यांची देयके त्यांच्या खात्यात जमा करायची आहेत. मात्र तीदेखील लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहेत. त्याबाबतचे काम सुरू असल्याचे संगवे यांनी सांगितले.

  • शाळा क्रमांक आणि विद्यार्थ्यांना दिलेली रक्कम

education table

+5
0
  • TAGS
  • money-depoisted-in-navi mumbai municipal students-account
SHARE
Facebook
Twitter
  • tweet
Previous articleरायगडमधील कुंडलिका खाडीवरील पुलाला भेग
Next articleतुकाराम मुंढेंविरोधात चौकशी समिती स्थापन
Siddharth Haralkar

RELATED ARTICLESMORE FROM AUTHOR

ठळक बातम्या

ठाणे जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी भव्य ‘रोजगार महाकुंभ’

ठळक बातम्या

जुलै 2025 मधील नमुंमपा पदभरती परीक्षेच्या निकालाचा मार्ग उच्च न्यायालयाच्या आदेशाने खुला

ठळक बातम्या

नवी मुंबईत एफडीए आणि नवी मुंबई पोलिसांची धडक कारवाई

News Archives

MOST POPULAR

नवी मुंबई महापालिकेच्यावतीने पत्रकारांचे कोविड लसीकरण

May 29, 2021

मनोधैर्य योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी संगणकीय प्रणाली निर्माण करणार : अदिती तटकरे

October 10, 2023

भाजपाच्या गुरुवारपासून शिवार संवाद सभा

May 24, 2017

स्वाइन फ्ल्यू नियंत्रणासाठी आरोग्य विभाग सतर्क

July 7, 2017
Load more

HOT NEWS

ठळक बातम्या

स्वच्छ नवी मुंबईच्या शिल्पकारांचा आपतर्फे गौरव

ठळक बातम्या

नागरिकांनी प्लास्टिक/कागदी ध्वजाचा वापर टाळावा

ठळक बातम्या

लातूरसाठी आणखी तीन रेल्वे

ठळक बातम्या

हायमास्ट झळाळणार एलइडी दिव्यांनी

ABOUT US
Avirat Vaatchal is your news, entertainment, music fashion website. We provide you with the latest breaking news and videos straight from the entertainment industry.
Contact us: aviratvaatchalnews@gmail.com
FOLLOW US
© Copyright 2016 - 2024 Avirat Vaatchal | All Rights Reserved | Design and Developed by Websteer Technologies
error: Content is protected !!
MORE STORIES

मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमिपूजन

September 14, 2017

मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर

February 9, 2017