चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत बंधनकारक

प्रेक्षकांनी उभे राहून राष्ट्रगीताचा मान राखावा- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली,1 डिसेंबर 2016:

चित्रपटगृहांमध्ये चित्रपट दाखविण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवावे आणि त्याचवेळी प्रेक्षकांनी उभे राहून राष्ट्रगीताचा मान राखावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. राष्ट्रगीताच्यावेळी पडद्यावर तिरंगाही दाखविणे बंधनकारक करण्यात आले असून याची तातडीने अंमलबाजवणी व्हावी,असेही केंद्र सरकारला सांगितले आहे.

चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजविण्याबाबत एक जनहित याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीवेळी न्या. दीपक मिश्रा आणि न्या. अमिताव रॉय यांच्या खंडपिठाने राष्ट्रगीत वाजविण्याबाबत आदेश दिला.

राष्ट्रगीताचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक लाभ घेऊ नये.त्याचे नाट्यीकरणही कू नये.राष्ट्रगीत सुरू असताना प्रेक्षकांनी उभे रहावे आणि त्यावेळी चित्रपटगृहाचे दरवाजेही बंद करावेत, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयाची १० दिवसांत अंमलबजावणी व्हावी,असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.