वाशीच्या काही भागाचा वीजपुरवठा उद्या बंद

 नवी मुंबई , 5 जानेवारी 17 / AV News Bureau

महावितरण कंपनीच्या वाशी विभागातील वीज वाहिनीचे देखभाल, दुरूस्तीचे काम उद्या करण्यात येणार असल्यामुळे वाशी विभागाच्या काही परिसराचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

२२ के.व्ही. नोसील लिंक लाईन या वीज वाहिनीवरील वृषाली हॉटेल ते दशमेरा आणि दशमेरा ते अल्ट्राटेक सिमेंट, भूषण हॉटेल, एमआयडीसी रबाळे आदी परिसराचा वीजपूरवठा तसेच २२ के.व्ही. फिलिप्स् या वीज वाहिनीवरीलएचटी ग्राहक – भारत बिजली, हिंदुस्तान लिव्हंर, दिवा नाका, शिवाजी फ्लोर मिल आणि मेरीडियन फ्लोर मिल, इंडिगो, पोलीस स्टेशनच्या मागील परिसर, महाजन हॉस्पिटल आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ५. वाजेपर्यंत बंद राहील. तर २२ के.व्ही. सावळा कोल्ड् स्टोरेज या वीज वाहिनीवरील सानपाडा परिसर, एम जी नगर, अलाना ग्रप आणि कुकशेत परिसर आदी भागाचा वीजपूरवठा सकाळी ९.०० ते संध्याकाळी ५.००वाजेपर्यंत बंद राहणार आहे.