व्हॉलीबॉल स्पर्धेत पश्चिम रेल्वे, हुपर्स विजयी

volleyball comp-a

नवी मुंबई, 21 फेब्रुवारी 2017 /AV News Bureau:

नवी मुंबई महापौर चषक व्हॉलीबॉल स्पर्धेत पुरुषगटात पश्चिम रेल्वे तर महिलांमध्ये हुपर्स संघाने विजेतेपद पटकावले आहे. नेरूळ जिमखाना येथे 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा पार पडली. महापौर सुधाकर सोनवणे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले.

Winner Mens Western Railway team

  • पुरुष गट

पुरूष गटात 5 पैकी 3 सेट जिंकत पश्चिम रेल्वे संघाने ए.आर.स्पोर्टस् कांदिवलीवर मात करीत विजेतेपदाचा चषक आणि  35 हजार रुपये असा पुरस्कार पटकावला. नवी मुंबई ॲमॅच्युअर व्हॉलीबॉल असो. या संघाने तृतीय तसेच वेदावित स्पोर्टस् क्लब या संघाने चतुर्थ क्रमांक संपादन केला.

पश्चिम रेल्वेचा व्हॉलीबॉलपटू जुबीन याला मालिकावीर (मॅन ऑफ द सिरीज) तसेच ए.आर.स्पोर्टस् क्लबचा व्हॉलीबॉलपटू कल्पेश याला अंतिम सामनावीर (मॅन ऑफ द फायनल मॅच) किताबाने सन्मानीत करण्यात आले.

Winners Women Hoopers Mumbai team

 

  • महिला गट

हुपर्स, मुंबई या महिला संघाने अंतिम सामन्यात आंध्रा महासभा, माटुंगा या संघावर विजय मिळवित विजेतेपद पटकाविले. ए.आर.स्पोर्टस् क्लब, कांदिवली यांनी तृतीय क्रमांक तसेच वेदावित स्पोर्टस् क्लब यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला.

महिला गटात हुपर्स मुंबईची व्हॉलीबॉलपटू मल्लिका हिस मालिकावीर (वुमन ऑफ द सिरीज) तसेच आंध्रा महासभेची व्हॉलीबॉलपटू भाग्यश्री हिला अंतिम सामनावीर (वुमन ऑफ द फायनल मॅच) किताबाने सन्मानीत करण्यात आले.

या स्पर्धेसाठी पुरूष गटात 13 तर महिला गटात 9 नामांकित संघ सहभागी झाले होते.