आदित्य ठाकरे यांच्या गाडीला अपघात

मुंबई,15जानेवारी 2017/AV News Bureau:

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजिव आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या गाडीला रविवारी दुपारी अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली.

आदित्य आपल्या बीएमडब्लू गाडीतून जात असताना कलानगर जक्शंनजवळ एका गाडीने जोरदार धडक दिली. या धडकेत कोणीही जखमी झालेले नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी धडक देणाऱ्या कारच्या चालकाला दंड ठोठावला आहे.