‘चित्रपट, समाजदर्शन आणि ओम पुरी’ वर परिसंवाद

मुंबई,ता.5 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सिने-मॉ  क्रिएशन्स आणि रंगस्वर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमान चित्रपट,समाजदर्शन आणि ओम पुरी या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. 7 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे हा कार्यक्रम होणार आहे.

या परिसंवादाला ज्येष्ठ सिने दिग्दर्शक श्याम बेनेगल, गोविंद निहलानी आणि कुंदन शहा आणि अन्य मान्यवर सहभागी होणार आहेत. तर लेखक अभिनेते अतुल तिवारी या परिसंवादाचे समन्वयक आहेत.

यावेळी सिनेमा आणि त्याचा समाजावर पडणारा प्रभाव यावरदेखील परिसंवाद होणार आहे.